भारतातील शेतकरी आंदोलनावर टिप्पणी करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले आहे. या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडाच्या नेत्यांना नाही, असे भारताने म्हटले आहे. canada pm justin trudeau
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील शेतकरी आंदोलनावर टिप्पणी करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले आहे. या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडाच्या नेत्यांना नाही, असे भारताने म्हटले आहे. canada pm justin trudeau
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भाष्य केले होते. भारतातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काळजी व्यक्त केली होती. कँनडामध्ये शीख समुदाय लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणाची गरज म्हणून ट्रुडो यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. कॅनडाने नेहमीच शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. तसेच आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली असल्याचेही ट्रुडो म्हणाले होते. आता यावर भारताने आक्षेप घेतला आहे.
canada pm justin trudeau
भारताने ट्रुडो यांना सुनावले आहे. कॅनडामधील लोकप्रतिनिधींना या संदर्भात पुरेशी माहिती नाही. तसेच यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही, अशी प्रतिक्रीया भारताकडून देण्यात आली. नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. यामुळे शेतकरी आंदोलन प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले आहे.