• Download App
    केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा CabinetReshuffle; Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet

    CabinetReshuffle : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार आणि फेरबदल होत असताना ५ महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये नवे नाव सामील झाले आहे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. CabinetReshuffle; Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट विस्तारापूर्वी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची चर्चा आहे. त्यामध्ये ज्या मंत्र्यांची कामगिरी मोदींना कमी वाटली, त्यांना ते राजीनामा द्यायला लावतील, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. त्यात आता डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची भर पडली आहे.

    आधीच केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याखेरीज महिला व बालविकास मंत्री देबोश्री चौधरी, उर्वरक व रसायन मंत्री सदानंद गौडा आणि कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही राजीनामा दिला आहे. त्याचवेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला होता. त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याची घोषणा आधीच झाली आहे.

    CabinetReshuffle; Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!