वृत्तसंस्था
बुलडाणा : जंगलव्याप्त पिंपरखेड गावात घरफोड्या अस्वलाची’ दहशत पसरली आहे. आठवड्यात अस्वलाने १२ घरे फोडली आहेत. त्याच्या उच्छादामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत.Burglar Bears’ Panic in Pimparkhed village
वनविभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळे दीड महिन्यापासून मानव वअस्वल यांच्या संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. एक भला मोठा अस्वल रात्रीला गावात येऊन घरफोडी करून घरातील अन्नधान्याची नासधूस करत आहेत..त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर वनविभाग याकडे दुर्लक्ष करतअसल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातो आहे.
– घरफोड्या अस्वलाची’ पिंपरखेड गावात दहशत
– अस्वल घराचे पत्रे, दरवाजे तोडून घरात प्रवेश करते
– तेल, कडधन्य व खाद्यपदार्थांवर मारते ताव
– वृद्ध आणि लहान मुले खूप घाबरतात
-अस्वलाची वनविभागाकडे वारंवार तक्रार
– एकदा अस्वलाला पकडून वनविभागाला कळविले
– कर्मचारी आले नाहीत, अस्वल पुन्हा मोकाट