विशेष प्रतिनिधी
नागपूर : संपूर्ण भारतात २३ ऑगस्टला सराफा व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिनेच विकण्याचे बंधन घातले आहे. त्याला विरोध नसून हॉलमार्कचा हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबर अर्थात HUIDमुळे व्यवसायात अनेक अडचणी सराफाना अडचणी येत आहे. Bullion merchants shops will be Closed on August 23 in all over India
या संदर्भात नागपूर सराफा असोसिएशनतर्फे नागपुरात पत्रपरिषद घेऊन बातमी देण्यात आली, नागपूरसह संपूर्ण विदर्भातही सराफा व्यवसायीकांतर्फे या बंदला पाठींबा देण्यात आला आहे.
- सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला देशभरात बंद
- हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे होतोय त्रास
- हॉलमार्क नंबर देणारी सेंटर वाढविण्याची गरज
- देशात ८०० जिल्हे मात्र २५६ मध्येच सेंटर
- हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबर लवकर मिळत नाही