• Download App
    Bullet train will now go to Ayodhya, Modi government's service for Ram devotees; 12 stations on Delhi-Varanasi route

    बुलेट ट्रेनने आता अयोध्येला जात येणार, मोदी सरकारची रामभक्तांसाठी सेवा; दिल्ली- वारणासी मार्गावर १२ स्टेशन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अयोध्येत भव्य राममंदिराचे काम वेगाने सुरु असताना रामभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे तुम्ही बुलेट ट्रेनने चक्क अयोध्येला जाऊ शकता. Bullet train will now go to Ayodhya, Modi government’s service for Ram devotees; 12 stations on Delhi-Varanasi route

    आता दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला बुलेट ट्रेन नेण्याची योजना आखली जात आहे. या मार्गावर १२ स्टेशन आहेत.त्यात अयोध्येचा समावेश केल्याने रामभक्त दिल्ली ते वारणासी असा प्रवास बुलेट ट्रेनने करताना अयोध्येत उतरून प्रभू श्री रामाचे दर्शन घेऊ शकतात.
    देशभरात बुलेट ट्रेनची चर्चा सुरु आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. गुजरातमध्ये त्यासाठी वेगाने काम सुरु आहे. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आणि इंटरनेटच्या जमान्यात बैलगाडीतून प्रवास करण्याची हौस असलेल्या पुढाऱ्यामुळे महाराष्ट्रात काम अडले आहे.
    संपूर्ण देशात अतिजलद प्रवास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून विविध ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्यात येत आहेत.



    दिल्ली ते वाराणसी या मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, सप्टेंबरपर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण होणार आहे.

    देशभरात बुलेट ट्रेनचे प्रकल्प राबवत असलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबत माहिती दिली. दिल्लीतील सराय काले खां येथून बुलेट ट्रेन सुरू होणार असून, पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंतच्या ८६५ किमी मार्गावर ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

    आता भाविक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन बुलेट ट्रेनने जाऊन घेऊ शकतात. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर १२ स्थानके निश्चित करण्यात येणार आहेत. त्यात नोएडा, मथुरा, आग्रा, इटावा, कन्नौज, लखनऊ, अयोध्या, रायबरेली, प्रयागराज, भदोही आणि वाराणसी या स्थानिकांचा समावेश आहे.

    दिल्ली ते वाराणसीचे अंतर ४ तासांत कापले जाणार आहे. दिल्ली ते अयोध्या आणि पुढे वाराणसीला जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. यमुना एक्स्प्रेस वेवरील प्रस्तावित जेवर एअरपोर्टशी ही बुलेट ट्रेन कनेक्ट होणार आहे.

    देशात अशा धावणार बुलेट ट्रेन

    •  वाराणसी-हावडा : सुमारे ७६० किमी
    •  मुंबई-नागपूर : सुमारे ७५३ किमी
    •  दिल्ली-अहमदाबाद : सुमारे ८६६ किमी
    •  चेन्नई-म्हैसूर : सुमारे ४५९ किमी
    •  दिल्ली-अमृतसर : सुमारे ४५९ किमी
    •  मुंबई-हैदराबाद : सुमारे ७११ किमी
    •  विस्तृत प्रकल्प अहवाल डिसेंबर २०२३ पर्यंत
    •  नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…