• Download App
    पी. जे. रेल्वे तातडीने सुरु करण्याची गरज पाचोरा ; जामनेरच्या प्रवाशांचा आग्रह British period Narrow Gage P. J. Railway Should be start urgently; Travelars urged the goverment

    WATCH : पी. जे. रेल्वे तातडीने सुरु करण्याची गरज पाचोरा ; जामनेरच्या प्रवाशांचा आग्रह

    वृत्तसंस्था

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पी. जे. नॅरोगेज रेल्वे पुन्हा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. गेल्या दोन वर्षांपासून ती बंद आहे.

    British period Narrow Gage P. J. Railway Should be start urgently; Travelars urged the goverment

    पाचोरा ते जामनेर या मार्गावर धावणारी ही रेल्वे पी. जे. म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोना संकटामुळे ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. पूर्वी ती दिवसाला चार फेऱ्या करत होती. अनेक गोरगरिब, शालेय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक प्रवास करत होते. पाचोरा ते जामनेर हे तब्बल ५६ कि. मी. अंतर आहे.

    पाचोऱ्याहून निघाल्यानंतर वरखेडी, पिंपळगाव (हरेश्र्वर), शेंदुर्णी, पहुर, भगदारा, व जामनेर, अशी ती धावत होती. या स्थानकावरुन नियमित चार फेऱ्या सुरु होत्या. परंतु या कोरोनामुळे दोन वर्षांपासून पी. जे. रेल्वे रुळावरुन धावलेली नाही. ही पी. जे. रेल्वे केंद्र सरकारने त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

    •  ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वे तातडीने सुरु करावी
    •  पाचोरा ते जामनेर या मार्गावर धावते ही रेल्वे
    •  कोरोनामुळे गेली दोन वर्षे रेल्वेसेवा आहे बंद
    •  एसटी बस, खासगी वाहना पेक्षा तिकीट कमी
    •  विद्यार्थी, सामान्य प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त

    British period Narrow Gage P. J. Railway Should be start urgently; Travelars urged the goverment

    Related posts

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!