• Download App
    BREAKING NEWS: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अचानक देशाला संबोधन;ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणाBREAKING NEWS: Prime Minister Narendra Modi's sudden address to the nation; big announcement on the background of Omicron

    BREAKING NEWS: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अचानक देशाला संबोधन;ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली.BREAKING NEWS: Prime Minister Narendra Modi’s sudden address to the nation; big announcement on the background of Omicron

    3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली.

    त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं.

     मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे –

    मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे वर्ष संपतंय. वर्ष संपण्यासोबत आता कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय.

    देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे.

    सगळ्यांनी सावध राहावं, सतर्क राहावं. काळजी घ्यावी. हात धुवत राहायला विसरायचं नाही आहे.

    व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.

    देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत.

    देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत.

    राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

    लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय.

    पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य  असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.

    लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे.

    कोरोना अजूनही गेलेला नाही. सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, देशातील नागरीकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अविरतपणे काम करत आहोत.

    ओमिक्रॉनवर देशातील वैज्ञानिकही बारकाईनं नजर ठेवून आहेत. याचा अभ्यास करत आहेत. आता जे अध्ययन देशातील संशोधकांनी केलं आहे, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात आले आहेत.

     

    BREAKING NEWS: Prime Minister Narendra Modi’s sudden address to the nation; big announcement on the background of Omicron

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख