परीक्षेशी संबंधित पेपर्सचे स्टॅक घेऊन जाणाऱ्या ट्रकला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आग लागली होती.
आगीत मराठी, हिंदी आणि इतर भाषांसह २५ विषयांच्या सुमारे अडीच लाख प्रश्नपत्रिका जळून खाक.
विशेष प्रतिनिधी
पुणे :महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा पुढे ढकलल्या जाणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर घाटाजवळ बुधवारी सकाळी या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत.Breaking news HSC EXAM
आगामी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेचे ‘महत्त्वाचे आणि गोपनीय पेपर’ पुण्याला घेऊन जाणाऱ्या ट्रकला पुणे-नाशिक महामार्गावर बुधवारी पहाटे आग लागून मोठे नुकसान झाले होते .त्याचाच परिणाम आता परीक्षेच्या तारखेवर झाला आहे .