• Download App
    BREAKING NEWS : भावपूर्ण श्रद्धांजली ! अनाथांची माय गेली ; सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन BREAKING NEWS: A heartfelt tribute! The orphans mother Sindhutai Sapkal dies in Pune

    BREAKING NEWS : भावपूर्ण श्रद्धांजली ! अनाथांची माय गेली ; सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

     विशेष प्रतिनिधी

    पुणे: अनाथांची माय भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी  त्यांचे निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्या होत्या.महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने  त्यांचे निधन झाले.BREAKING NEWS: A heartfelt tribute! The orphans mother Sindhutai Sapkal dies in Pune

    अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.

    आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

    त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं.

    BREAKING NEWS: A heartfelt tribute! The orphans mother Sindhutai Sapkal dies in Pune

    Related posts

    Vahan Portal Rules : गाडी हस्तांतरणासाठी आता NOCची गरज नाही; वाहन पोर्टलवरून ऑनलाइन पडताळणी होईल, फिट असल्यास 15 वर्षांनंतरही चालवता येईल जुनी कार

    Nitish Kumar : नितीश कुमार यांना डिजिटल अरेस्ट केले आहे, पाटण्यात राजेश राम म्हणाले – भाजप मैत्री करून पाठीत खंजीर खुपसतो, पुढचा नंबर चंद्रबाबू नायडूंचा

    Brahmos Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली इंडोनेशिया खरेदी करणार; $200 दशलक्ष ते $350 दशलक्षच्या करारावर चर्चा सुरू