- राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण; भाजपची टीका
वृत्तसंस्था
मुंबई : सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरून ठाकरे – पवार सरकारला फटकारले आहे. अशा टीकेकडे दुर्लक्ष करायला शिका, तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे दाखल करणार काय?, अशी समज न्यायालयाने सरकारला दिली. uddhav thackeray news
उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपने सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी सुनयना होले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात टीका केली होती. त्याला अक्षेपार्ह वक्तव्य होले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुनयना हिने न्यायलयात धाव घेतली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायलयाने राज्य सरकारला फटकारले आहे.
uddhav thackeray news
सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार? दुर्लक्ष करायला शिका.. अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सुडबुद्धी ठाकरे – पवार सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, अशी खोचक टीका भाजपने केली आहे.