- बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्वीन कंगना रनौत(Kangana Ranaut) सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: क्वीन कंगना रनौत(Kangana Ranaut) सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती आपल्या बहुचर्चित ‘थलाईवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिवंगत जयललिता यांच्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाची सर्वांनाचं मोठी उत्सुकता आहे.
कंगनाने नुकताच जयललिता यांच्या समाधीवर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा कंगना मोठ्या प्रमाणात चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दरम्यान कंगनाने आपलं नाव बदलत सर्वांनाचं आश्चर्यचकित केलं आहे.BOLLYWOOD: ‘Thalaivi’ Kangana Ranaut’s big decision; The actress changed her name …
अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या प्रत्येक गोष्टींमुळे चर्चेचा विषय बनलेली असते. कंगना अलीकडे आपल्या आगामी ‘थलाईवी’ या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाचं बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे जात आहे.
आत्ता कंगनाने आपल्या या चित्रपटाचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरु केलं आहे. सध्या कंगना प्रमोशनसाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहे. आत्ता प्रमोशनचा भाग म्हणावं किंवा अन्य काही, पण कंगनाने आपल्या सोशल मीडियावरील नावात बदल केला आहे.
कंगनाने म्हटलं आहे, की तिच्यावर जयललिता यांचा मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवरील नावात बदल करत, कंगना रनौतच्या जागी कंगना थलाईवी असं केलं आहे. कंगनाने मोठा निर्णय घेत इन्स्टाग्रामवर आपल्या नावासमोरून रनौत हटवलं आहे. येत्या 10 सप्टेंबरला ‘थलाईवी’ जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी, तमिळ,तेलुगु अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.