• Download App
    यूपी सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडू देणार नाही; अशोक चव्हाणांची गर्जना | The Focus India

    यूपी सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडू देणार नाही; अशोक चव्हाणांची गर्जना

    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके आम्ही तोडू देणार नाही, अशी गर्जना काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई बॉलिवूड दौऱ्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया आली आहे. bollywood news latest

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यात काही उद्योजक तसेच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी ते चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. यावरूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीने रान पेटवायला सुरवात केल्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरवात केली आहे.

    bollywood news latest

    मुंबईमधील चित्रपट उद्योगाला आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा विचार असून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हा डाव असल्याचे मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. याबाबत चव्हाण म्हणाले, की भाजपच्या ५ वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही.

    चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केल्याचा आरोपही केला आहे. “मागील पाच वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे राज्य सरकार आणि नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोला लगावला.

    चव्हाण यांनी, देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये, असा टोला राज्यातील भाजप नेत्यांना लगावला.

    bollywood news latest

    योगी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बॉलिवूडवरुन सध्या तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाची बाजू स्पष्ट केली आहे. पाटील यांनी कोणीही मुंबईमधून बॉलिवूड हलवू शकत नाही, असे म्हटले आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…