• Download App
    BOLLYWOOD : अर्जुन कपूरसह अनिल कपूरच्या मुलीला करोनाची लागण BOLLYWOOD: Anil Kapoor and Arjun Kapoor's daughter infected with corona

    BOLLYWOOD : कपूर कुटुंबात कोरोना ! अर्जुन कपूरसह अनिल कपूरच्या मुलीला करोनाची लागण…

    • बॉलिवूड सेलिब्रिटींनी ख्रिसमस पार्टी पडली महागात
    • करीना कपूरनंतर आता अभिनेता अर्जुन कपूर, अंशुला कपूर कोरोना पॉझिटिव्ह
    • अनिल कपूर यांची मुलगी रिया आणि जावई करण बुलानी देखील कोरोना पॉझिटिव्ह

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई: कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून आता बॉलिवूडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. अभिनेता अर्जून कपूर आणि त्याची छोटी बहीण अंशुला या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. अर्जून कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.BOLLYWOOD: Anil Kapoor and Arjun Kapoor’s daughter infected with corona

    ई टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता घरी क्वारंटाईन आहेत.त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहन अर्जून कपूरने केलं आहे.

    ख्रिसमस निमित्त अभिनेत्री मलायका अरोराने घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिनेता अर्जून कपूरही सहभागी झाला होता. त्याचबरोबर मलायका अरोराची बहीण अमृता अरोराही हजर होती.

    या पार्टीमध्ये अर्जून कपूर आणि मलायका एकत्र दिसले होते. त्यामुळे मलायका अरोराचीही चाचणी केली जाणार असल्याचं वृत्त आहे. या पार्टीमध्ये करीना कपूर कुटुंबासोबत सहभागी झाली होती. त्यामुळे याच पार्टीमध्ये अर्जून कपूरला कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    BOLLYWOOD: Anil Kapoor and Arjun Kapoor’s daughter infected with corona

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले

    Atishi’s : आतिशी यांच्या व्हिडिओवर पंजाबमध्ये गदारोळ; विरोधक म्हणाले- शीख गुरुंचा अपमान केला; म्हणाल्या- ‘कुत्र्यांचा आदर करा’ असे म्हटले होते

    MP High Court : एमपी हायकोर्टाने म्हटले- प्रोबेशनमध्ये वेतन कपात करणे अवैध, कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पैसे परत करण्याचे आदेश