Yami Gautam Summoned By ED : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लग्नानंतर नुकतीच मुंबईत परतली आहे. ते इथे येताच तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यामी गौतमला समन्स बजावले आहे. Bollywood Actress Yami Gautam Summoned By ED in Money Laundering Case Mumbai
वृत्तसंस्था
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लग्नानंतर नुकतीच मुंबईत परतली आहे. ते इथे येताच तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यामी गौतमला समन्स बजावले आहे.
नुकतेच झाले लग्न
फेमा अंतर्गत कथित अनियमिततेबाबतचे जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्रीला समन्स पाठविण्यात आले आहे. ईडीने पुढच्या आठवड्यात यामीला हजर राहून तिचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.
गत महिन्यात 4 जून रोजी या अभिनेत्रीने बॉलीवूड दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. आदित्य धर यांनी उरीचे दिग्दर्शन केले होते. यामीही या चित्रपटात होती. या दोन्ही स्टार्सच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हिमाचलमध्ये लग्न झाले. हा सोहळा अगदी साध्या पद्धतीने झाला. लग्नानंतर दोघे काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतले आहेत आणि त्यांनी काम सुरू केले आहे.
यामी गौतमचे आगामी चित्रपट
यामीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच तिच्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याशिवाय दसवीं या चित्रपटात यामी गौतम अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. भूत-पोलिस मध्ये ती सैफ अली खानसमवेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Bollywood Actress Yami Gautam Summoned By ED in Money Laundering Case Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!
- काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत : वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा
- माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार
- UAE Travel Ban : भारत आणि पाकिस्तानसह या देशांमध्ये प्रवासाला यूएईच्या नागरिकांना बंदी, कोरोनामुळे ट्रॅव्हल बॅन