विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘द इनकार्नेशन सीता’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये आणि विविध माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. सुरुवातीला या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि करिना कपूर यांचे नाव घेतले गेले. तर आता आलेल्या नवीन बातमीनुसार ही भूमिका करीना कपूर किंवा दीपिका पदुकोण साकारणार नसून त्यामध्ये कंगना राणावत अधिकृतरीत्या मुख्य भूमिका साकारणार आहे. Bollywood Actress Actress Kangana Ranaut will play the role of Sita, Movie Titled as The Incarnation Sita
कंगनाने आपल्या या चित्रपटाबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या नावावर आता या चित्रपटासाठी शिक्कामोर्तब झाले आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरुन या चित्रपटाचे पोस्टरदेखील शेअर केले आहे. या पोस्टनुसार कंगना राणावतच सीतेची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून करिना आणि दीपिका यांच्या नावाची चर्चा या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चालू होती. माध्यमांमध्ये अशीही चर्चा होती की, या रोलसाठी आधी करिनाला विचारले गेले होते. पण करिनाने या रोलसाठी बारा कोटींचे मानधन मागितले. आणि त्यावरून तिला ट्रोलही केले गेले होते. त्यांनंतर दीपिका ही मुख्य भूमिका साकारणार असल्याची चांगलीच चर्चा सर्व माध्यमांमधील प्रेक्षकांमध्ये रंगली होती. परंतु या सर्व अफवा पसरवल्या गेल्या होत्या.
लेखक मनोज मुंताशीर यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ते असेही म्हणाले की या भूमिकेसाठी आम्ही तरूण अभिनेत्रीच्या शोधात होतो. हा चित्रपट बाहुबली प्रमाणे बिग बजेट चित्रपट असणार आहे आणि यामध्ये बाहुबली सारखा भव्यदिव्य सेट उभारला जाणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता निर्माण झालेली आहे.
Bollywood Actress Actress Kangana Ranaut will play the role of Sita, Movie Titled as The Incarnation Sita
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप नेत्याच्या अटकेसाठी अलिगडमध्ये आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण, मुख्यमंत्री ममतांच्या शिरावर ठेवले होते 11 लाखांचे इनाम
- महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात! आई शेतात-नराधमांकडून गतिमंद घरात घुसून बलात्कार
- कोविड-19 लसीचा तिसरा डोस ‘अनैतिक’ आहे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांचे प्रतिपादन
- संजय राऊत यांनी केली पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, म्हणाले- त्यांच्या तोडीचा कोणीही नाही
- पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर संक्रांत; सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; नवज्योत सिध्दू कँप जोमात