• Download App
    कोरोना काळातील 'मसीहा' बॉलिवूड अभिनेत सोनू सूदला कोरोनाची लागण;तरीही मदतीसाठी तत्पर Bollywood Actor Sonu sood tested corona positive

    कोरोना काळातील ‘मसीहा’ बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण;तरीही मदतीसाठी तत्पर

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. Bollywood Actor Sonu sood tested corona positive

    सोनू सूदचे ट्वीट

    नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूदने केले आले.

    कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ वाढतोच आहे.

     

    लाखो लोकांना त्याने कोरोना काळात मदत केली. तसेच आताही तो अनेकांची मदत करतो. अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत करतात.

    सोनूला लवकर बरं वाटावं म्हणून सर्वच प्रार्थना करत आहेत.

     

    Bollywood Actor Sonu sood tested corona positive

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस