Jeff Bezos Space Trip : ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आज (20 जुलै) अंतराळ परिक्रमा करून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. या प्रवासामुळे बेझोस यांनी अंतराळ पर्यटनाचे नवे क्षेत्र जगाला खुले केले आहे. जेफ बेझोस यांच्या आधी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक रिचर्ड ब्रेनसन 11 जुलैला अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर परतले होते. पण पहिल्यांदाच एखाद्या माणसाने ब्ल्यू ओरिजिनचे रॉकेट न्यू शेफर्डमधून अंतराळ प्रवास केला आहे. हे एक स्वयंचलित रॉकेट आहे, ज्यास चालविण्यासाठी पायलटची गरज भासत नाही. Blue Origin Launch Amazon Founder Jeff Bezos Space Trip completed successfully On New Shepard Rocket
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आज (20 जुलै) अंतराळ परिक्रमा करून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. या प्रवासामुळे बेझोस यांनी अंतराळ पर्यटनाचे नवे क्षेत्र जगाला खुले केले आहे. जेफ बेझोस यांच्या आधी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक रिचर्ड ब्रेनसन 11 जुलैला अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर परतले होते. पण पहिल्यांदाच एखाद्या माणसाने ब्ल्यू ओरिजिनचे रॉकेट न्यू शेफर्डमधून अंतराळ प्रवास केला आहे. हे एक स्वयंचलित रॉकेट आहे, ज्यास चालविण्यासाठी पायलटची गरज भासत नाही.
आज अंतराळात एक नवा इतिहास रचला गेला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिनचे टूरिझम रॉकेट न्यू शेफर्ड आज 6.30 मिनिटांनी चार जणांना घेऊन अंतराळात गेले. यानंतर काही वेळातच ते सर्वांना पृथ्वीवर सुखरूप परत घेऊन आले.
जेफ बेझोस, त्यांचे भाऊ मार्क, नेदरलँड्सचा 18 वर्षीय ऑलिव्हर डॅमन, विमानचालन क्षेत्रातील व्हॅली फंक या 82 वर्षीय महिलेनेही या अंतराळ प्रवासात सहभाग नोंदवला.
कसे आहे हे टुरिझम रॉकेट?
- पाच मजली उंच न्यू शेफर्ड रॉकेटची रचना अशी आहे की यात सहा जणांसह अंतराळ उड्डाण करता येईल.
- हे रॉकेट प्रवाशांना सुमारे 340,000 फूट उंचीवर नेण्यास सक्षम आहे.
- ज्यांना यामध्ये जायचे आहे त्यांना काही मिनिटांसाठी मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये वजन नसण्याचा अनुभव घेता येईल.
- त्यामध्ये बसलेले लोक पृथ्वीला अगदी उंचीवरून पाहू शकतील.
- न्यू शेफर्ड रॉकेट आणि कॅप्सूलचे नाव 1961चे अंतराळवीर अॅलन शेफर्ड यांच्या नावावर आहे.
- अॅलन शेफर्ड अंतराळापर्यंत पोहोचणारे पहिले अमेरिकन नागरिक होते.
- या यानात 6 प्रवासी बसू शकतात, परंतु आज संध्याकाळी त्यात चारच प्रवासी बसले होते.
- या रॉकेटच्या उड्डाणाकरिता कोणताही पायलट नाही आणि हे यान पूर्णपणे स्वयंचलित आहे. हे जमिनीवर तयार केलेल्या मास्टर कंट्रोल सेंटरवरून नियंत्रित केले जाते. प्रक्षेपणानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमांड देण्याची गरज भासत नाही.
Blue Origin Launch Amazon Founder Jeff Bezos Space Trip completed successfully On New Shepard Rocket
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Controversy : फडणवीसांनी विरोधकांना धरले धारेवर, सांगितली यूपीए काळातली टॅपिंग, काही माध्यमांना चिनी फंडिंग अन् बदनामीचा कट
- Pegasus Controversy : ओवैसी म्हणाले- सरकारनं सांगावं हे सॉफ्टवेअर विकत घेतलं की नाही, पीएम मोदींनी काय कारवाई केली?
- अदानी समूहाच्या सेबीकडून चौकशीच्या चर्चांमुळे कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सहापैकी चार कंपन्यांमध्ये लोअर सर्किट
- प्राप्तिकर विभागाच्या रडारवर मुख्यमंत्री ठाकरेंचे सल्लागार अजोय मेहता, फ्लॅटच्या व्यवहाराची चौकशी सुरू
- तालिबान्यांनी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ डागले रॉकेट, बकरीदच्या नमाजेवेळी झाला हल्ला