- भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं याआधीच भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे मायकेल स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाही .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या कोरोनाने भारतात थैमान घातले असल्यामुळे अनेक विदेशी क्रिकेटपटू आपल्या मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे तीन क्रिकेटपटू लीगच्या मध्यातच आपल्या मायदेशी देशात परतले आहेत. त्याचबरोबर आयपीएलशी संबंधित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल, असे ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले होते. यावरून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ट्विटद्वारे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना खडे बोल सुनावले आहेत.‘Blood on your hands’: Michael Slater slams Australian PM
ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणारी विमाने १५ मेपर्यंत रद्द केली आहेत. त्यामुळे लीगमधील खेळणाऱ्या खेळाडूंना आणि समालोचकांना परतीचा मार्ग देखील बंद झाला आहे.
स्लेटर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “जर सरकारने ऑस्ट्रेलियन लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली, तर ते आम्हाला घरी येऊ देतील. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान तुमच्या हाताला रक्त लागले आहे, आमच्याशी असे वागण्याची तुमची हिंमत कशी झाली? आपण क्वारंटाइन सिस्टिमविषयी काय बोलाल? मी सरकारकडून आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.”
दरम्यान, आयपीएल खेळणारे खेळाडू आणि समालोचक सर्व बायोबबलमध्ये आहेत. मात्र बायोबबलमध्ये असतानाही कोलकाता नाइट राइडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूमधील सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
‘Blood on your hands’: Michael Slater slams Australian PM