पाणीदार, टपोऱ्या डोळ्यामुळे व्यक्तीमत्व खुलून दिसते. माणासाचे दोन डोळे म्हणजे जग पाहण्यासाठीच दिलेली देणगीच आहे. डोळ्यांच्या रुपानेच आपण माहितीचा साठा अधिक मिळवतो. अशा या डोळ्यांचे शरीरातील स्थान खूप मोलाचे आहे. प्रत्येकाच्या डोळाच्या रंग हा वेगळा असतो. Black, black. How to get blue eyes ..
कोणाचे डोळे काळेभोर पाणीदार असतात. तर काहींचे डोळे घारे, निळे तर कधी कधी चक्क हिरवटदेखील असतात. प्रामुख्याने वातावरणाच्या माणसाच्या त्वचेवर परिणाम सहज जाणवतो. युरोपातील बहुतांश लोक गोरे असल्याचे आपल्याला पहायला मिळते.
तर आफ्रिका खंडातील लोक कृष्णवर्णीय दिसतात. संशोधकांच्या मते सर्व मानवजात होमोसॅपिअनस गटात येते. त्यामुळे पृथ्वीतलावरील सर्व माणसे ९९ टक्के सारखीच आहेत. माणसाच्या त्वचेचा रंग हा कातडीच्या कोशातील मेलॅनीन नावाच्या काळ्या द्रव्यावर अवलंबून असतो.
मेलॅनोसाईटस् नावाचे हे कोश मेलॅनिन तयार करतात. आपल्या सर्वांच्या शरीरात मेलॅनोसाईटस् ची संख्या सारखीच असते. फरक आहे तो या मेलॅनोसाईट्सनी तयार केलेल्या मेलॅनिन या रंग द्रव्यामुळे. प्रखर सूर्यप्रकाश व गरम हवा यामुळे मेलॅनोसाइट उत्तेजित होतात.
त्यामुळे त्यां व्यक्तीचा रंग हा काळा दिसतो. थंड हवा व कमी सुर्यप्रकाश असल्यास हे मेलॅनोसाइट त्याचे काम मंदगतीने करतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा रंग गोरा दिसतो. या कारणामुळे विषुववृत्तजावळच्या गरम प्रदेशातील लोक प्रामुख्याने आफ्रिका, आशियातील लोक वर्णाने काळे तर युरोपात सुर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे तेथील लोक गोरे असतात.
कोणत्याही माणसांच्या डोळ्यांचा रंग मेलॅनिनच्या प्रमाणात ठरतो. माणसाच्या डोळ्यांच्या बुबुळात जर मेलॅनिनचे प्रमाण जास्त असेल तर त्या व्यक्तीचे डोळे काळे दिसतात. मेलॅनिनच्या प्रमाणावर डोळ्यांचा रंग घारा किंवा अन्य छटांचा दिसतो.
भारतात प्रामुख्याने काळ्या किंवा घाऱ्या डोळांची माणसे दिसतात. पिवळ्या रंगाचा डोळ्या असणाऱ्या व्यक्ती फार क्वचित आढळतात. मेलॅनिनचे प्रमाण जर अल्प असेल तर त्या व्यक्तीचे डोळ हिरव्या रंगाचे दिसतात. अफगणिस्तानात अशा हिरव्या रंगाचे डोळे असणारे अनेक लोक आढळतात. जर माणसाच्या डोळ्यात मेलॅनिनचा अभाव असेल तर त्या व्यक्तीचे डोळे निळे दिसतात.