वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षात म्हणजे २०१९ ते २०२१ पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आलेख चढता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पासून प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि कार्यकर्त्यानी दिलेल्या योगदानामुळे भाजपचा प्रत्येक निवडणुकीत विजय झाला आहे. याबाबतच्या आकडेवारीवरून ही बाब अधिकच स्पष्ट होत आहे. BJP’s victory graph rose In Uttar Pradesh elections in two-year
विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या करकीर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती आहे. राज्यात भाजपच्या विजयाचा रथ कायमच अग्रेसर ठेवण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे.
उत्तरप्रदेशातील दोन वर्षातील विधानसभा पोटनिवडणूक, जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बहुमताने आणि बहुसंख्येने निवडून आले आहेत. भाजपची ही गेल्या दोन वर्षातील कामगिरी नेत्रदीपक आहे.
भाजपची दोन वर्षातील कामगिरी
१) ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभेच्या पहिल्या पोटनिवडणुकीत भाजपाला ११ पैकी ९ जागा
२)नोव्हेंबर २०२० मधील विधानसभेच्या दुसऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाला ७ पैकी ६ जागा
३) नोव्हेंबर २०२० मधील शिक्षक/ पदवीधर विधान परिषद निवडणुकीत भाजपला ९ पैकी ६ जागा
४) जुलै २०२१ मधील जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत भाजपाचा ७५ पैकी ६७ जागांवर विजय
५ )जुलै २०२१ मधील ब्लॉक प्रमुख निवडणुकीत भाजपाला ७३५ पैकी ६४८ जागांवर विजय मिळाला आहे.
BJP’s victory graph rose In Uttar Pradesh elections in two-year
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक म्हणाले- राष्ट्रवादी आणि भाजप नदीचे दोन किनारे, दोन्ही एकत्र येणे अशक्य
- शिवसेना विधानसभा संघटक प्रमोद दळवींची ईडीकडून चौकशी, पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवान यांच्याशी आर्थिक व्यवहारांवरून ईडीचा तपास
- EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !
- लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप
- अमेरिकेने भारताला सोपवले घातक MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स; अशी आहेत वैशिष्ट्ये