• Download App
    मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका BJP's sit-in agitation on Mumbai-Agra highway; Aggressive role on various issues of farmers

    WATCH : मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई आग्रा महा मार्गावर शेतकरी वीजप्रश्नी आणि पीक नुकसान भरपाई आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. BJP’s sit-in agitation on Mumbai-Agra highway; Aggressive role on various issues of farmers

    आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली दोन तास मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आले.

    सक्तीने विज बिल वसुली, लाईट कट करणे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही व सरकार केवळ वसुलीत मग्न असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी आज मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड पेट्रोल चौफुली येथे आंदोलन करण्यात आले. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १५ दिवसांकरीता माघार घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिला.

    •  मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन
    •  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका
    •  चांदवड पेट्रोल चौफुली येथे दोन तास आंदोलन
    •  सक्तीने विज बिल वसुली, लाईट कट करणे चुकीचे
    •  अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत नाही
    •  सरकार केवळ वसुलीत मग्न असल्याचा आरोप
    •  शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे.
    •  सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन

    BJP’s sit-in agitation on Mumbai-Agra highway; Aggressive role on various issues of farmers

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…