विशेष प्रतिनिधी
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने २१/० असा दणदणीत आणि एकतर्फी विजय प्राप्त केला. महाविकास आघाडीतील ज्या मंत्र्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांना भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी सपशेल धूळ चारली आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते. गुरुवारी (ता.१ ) मतमोजणी झाली.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सहकार पॅनेलच्या पराभवासाठी कंबर कसली होती. पण, त्यांचे सर्व प्रयत्न विफल गेले.
- साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी
- सहकार, रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरस
- मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मोर्चेबांधणी विफल
- सहकार पॅनेलचा २१ विरुद्ध ० असा विजय
- रयत आणि संस्थापक पॅनेलला एकही जागा नाही
- डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वात सहकार सत्तेवर