• Download App
    भाजप नेतृत्वाने दिल्या विविध मोर्चांना नव्या असाइनमेंट्स; वन धन, शेतकरी संघटन, महिलांच्या पोषणावर भर; १ लाख आरोग्य स्वयंसेवक घडविणार BJP tasks Morchas to take Centre's schemes to masses, train 1 lakh health volunteers

    भाजप नेतृत्वाने दिल्या विविध मोर्चांना नव्या असाइनमेंट्स; वन धन, शेतकरी संघटन, महिलांच्या पोषणावर भर; १ लाख आरोग्य स्वयंसेवक घडविणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोनाचे संकट आणि भविष्यात येणाऱ्या निवडणूका या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनेअंतर्गत असणाऱ्या आपल्या विविध मोर्चांना ऍक्टिव्हेट करण्याचे ठरविले असून त्यांना दीर्घकालीन असाइनमेंटही दिल्या आहेत. BJP tasks Morchas to take Centre’s schemes to masses, train 1 lakh health volunteers

    एससी – एसटी मोर्चाला वन धन योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले असून किसान मोर्चाला शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि शेतकरी उत्पादक संघबांधणीचे काम करण्यास सांगितले आहे. महिला मोर्चाला महिलांच्या पोषणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले असून केंद्राच्या महिला केंद्रीत योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम देण्यात आले आहे. या तीनही मोर्चांना देण्यात आलेल्या असाइनमेंट दीर्घकालीन आहेत आणि त्याचा परिणामही दीर्घकालीन आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १ लाख आरोग्य स्वयंसेवक तयार करून त्यांना प्राथमिक वैद्यकीय ज्ञान देणे आणि त्यांचा विविध योजनांसाठी वापर करणे यावर भर देण्यात आला आहे. भाजपचे सरचिटणीस अरूणसिंग आणि खासदार भूपेंद्र यादव यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.



    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या विविध मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक घेतली. त्यात सेवा ही संघटन कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. भाजप गेल्या वर्षभरात या कार्यक्रमाआधारे १ लाख ८० हजार गावात पोहोचला. शहरांमधल्या ५० हजार वॉर्डांमध्ये उपक्रम घेतले. ८० हजार रक्तदान शिबिरे घेण्यात आली. विविध वैद्यकीय वस्तूंचे वाटप करण्यात आले. ५८०० विडिओ कॉन्फरन्स घेण्यात आल्या. हे कार्यक्रम आतापर्यंत झाले.

    या पुढचे स्वरूप म्हणून भाजपने आपल्या विविध मोर्चांना असाइनमेंट्स दिल्या आहेत. किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या उत्पादकांच्या संघटना बांधणीचे काम करायचे म्हणजे सध्याच्या दलाल व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे. यातून शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभे करण्याचा मनसूबा आहे.

    जनधन योजना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली. तशीच वन धन योजना एससी, एसटी समाजात लोकप्रिय करून आदिवासींचे, पिछड्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याची सरकारची योजना आहे. ती योजना त्या समाजात सर्वदूरपर्यंत नेण्याचे काम एसटी मोर्चाला देण्यात आले आहे. यातून समाजाचा एक मोठा घटक मुख्य राजकीय प्रवाहात सहभागी होऊ शकणार आहे. तर महिलांच्या पोषणाचे दीर्घकालीन काम महिला मोर्चाला देण्यात आले आहे.

    BJP tasks Morchas to take Centre’s schemes to masses, train 1 lakh health volunteers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य