• Download App
    ठाकरे – पवारांच्या मंत्र्यांविरोधातील तोफांच्या माऱ्याला कृषी कायद्याच्या चर्चेचा बार काढून प्रत्युत्तर…??; पवारांनी दिले संकेत BJP stratemgy to encircle ministers ajit pawar, anil parab and nitin raut, will MVA be able to counter it by allowing discission on farm bills?

    ठाकरे – पवारांच्या मंत्र्यांविरोधातील तोफांच्या माऱ्याला कृषी कायद्याच्या चर्चेचा बार काढून प्रत्युत्तर…??; पवारांनी दिले संकेत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे – पवार सरकारच्या अजित पवार, अनिल परब, नितीन राऊत मंत्र्यांवर विरोधी भाजपकडून आरोपांच्या तोफांचा भडिमार होणार असल्याचे पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांवरील चर्चेचा विषय काढून प्रत्युत्तर देण्याचे सूचित केले आहे. BJP stratemgy to encircle ministers ajit pawar, anil parab and nitin raut, will MVA be able to counter it by allowing discission on farm bills?

    शरद पवारांनी डी. वाय. पाटील विद्यापीठात पत्रकारांशी बोलताना याच विषयाचे संकेत दिल्याचे मानले पाहिजे. त्यांनी कृषी कायदा हा जवळजवळ महाराष्ट्रात तरी बासनात गेलेला विषय बाहेर काढलाय. दोन दिवसांच्या अधिवेशनात त्यावर चर्चा शक्य नाही. पण कोणी चर्चा काढलीच तर महाविकास आघाडी सरकारने आपल्या बाजूने वादग्रस्त मुद्द्यांची चर्चा करावी, असे शरद पवारांनी म्हटले आहे.



    याचा अर्थच पवारांना कृषी कायद्यांची चर्चा दोन दिवसांच्या अधिवेशनात पाहिजे आहे. त्यांना मंत्र्यांवरील तोफांच्या विरोधात केंद्राच्या कृषी कायद्याविरोधातील चर्चेचे बार काढायचे आहेत, असा घ्यायचा काय…?? शक्यता तर तीच दिसते आहे.

    अर्थात, याचा राजकीय परिणाम कितपत साधला जाईल आणि अत्यंत आक्रमक आमदार भाजपला सत्ताधारी कितपत रोखू शकतील…?? या विषयी मात्र शंका आहे. कारण अजित पवार, अनिल परब आणि नितीन राऊत या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपकडे दारूगोळा भरपूर आहे. त्या तुलनेत कृषी कायद्यावरील चर्चेचा बार फारच फुसका ठरण्याची शक्यता आहे. पण ज्या अर्थी शरद पवारांनी बाळासाहेब थोरातांचे नाव घेऊन कृषी कायद्यांवरील चर्चेचा विषय आज काढला आहे, त्या अर्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार यातून पुरेसा सिग्नल घेण्याची शक्यता आहे आणि निदान आपल्या मंत्र्यांवरील प्रखर हल्ले परतविण्यासाठी तरी कृषी कायद्यांवरील चर्चेचा बार काढण्याची शक्यता वाटते आहे.

    BJP stratemgy to encircle ministers ajit pawar, anil parab and nitin raut, will MVA be able to counter it by allowing discission on farm bills?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; पण निवडणूक आयोगाच्या आव्हानापासून काढली पळपुटी!!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; शिवाय कर्नाटकातले जात सर्वेक्षणही जुन्याच मतदार यादीनुसार!!