– भाजप 1836, काँग्रेस 1718
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेस पक्षावर मात केली आहे. Rajasthan zp, panchayat elections
शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना ग्रामीण भागातील राजकारणाचा चेहरामोहरा सांगणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजस्थानात झाल्या. यातील प्रत्येक निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील कौन स्पष्ट करून गेली आहे.
काँग्रेस काढतीय “वड्याचे तेल वांग्यावर; भांडण राजस्थानात, आंदोलन महाराष्ट्रात
दोन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीत आजमावली गेली. शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना नवीन कृषी बिलांच्या आधारावर राज्यात जोरदार प्रचार करण्यात आला. स्थानिक मुद्दे यांच्या बरोबरीने हा प्रचार गाजला. दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी तुल्यबळ असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही पक्षांनी आपली संघटनात्मक ताकद झोकून प्रचार केला. यात प्रत्येक ठिकाणी मात करण्यात भाजप यशस्वी ठरला.
Rajasthan zp, panchayat elections
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर आपले सरकार अस्थिर करण्याचा त्याचबरोबर अन्य सहा राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्याचाही उपयोग काँग्रेसने प्रचारात भरपूर करून घेतला परंतु या प्रचारावर देखील भाजपने मात करून निवडणुकीत मोठे यश मिळवले. भाजपने पंचायतीच्या 1836, काँग्रेसने 1718, झेडपी मध्ये भाजपने 323 तर काँग्रेसने 240 जागा मिळवल्या. निवडणूक राजकीय दृष्ट्या घासून झाली यात भाजपने काँग्रेसवर मात करून दाखवली.