• Download App
    भाजप-शिवसेना एकत्र?गडकरींच सुचक वक्तव्य ; मुंबई-दिल्लीचा रस्ताच नाही तर मुंबई-दिल्लीचं मनंही जोडेन ...BJP-Shiv Sena together? Gadkari's suggestive statement; Not only Mumbai-Delhi road but also Mumbai-Delhi mind will be connected ...

    भाजप-शिवसेना एकत्र?गडकरींच सुचक वक्तव्य ; मुंबई-दिल्लीचा रस्ताच नाही तर मुंबई-दिल्लीचं मनंही जोडेन …

    राजकारण काहीही असलं तरीही विकासाच्या बाबतीत कोणतेही मतभेद मतभिन्नता नाही. महाराष्ट्रात भारत सरकारच्या वतीने सर्वच क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यात आलेला नाही.


    महाराष्ट्रातील आजचं जे सरकार आहे ती एक अनैसर्गिक युती आहे. कारण विचारधारेच्या आधारावर आणि सिद्धांताच्या आधारावर ही युती नाही. मी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहे.


    सध्या मी मंत्री आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या माध्यमातून देशाचा विकास कसा होईल हा माझा अजेंडा आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: ‘मनं जोडलीच पाहिजेत त्याकरता मला दुधात साखर टाकता येईल.. तेवढीच टाकण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. रस्ताही जोडेन आणि मनंही जोडण्याचा प्रयत्न करेन.’ असं अत्यंत सूचक वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे.गडकरींच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.BJP-Shiv Sena together? Gadkari’s suggestive statement; Not only Mumbai-Delhi road but also Mumbai-Delhi minds will be connected …

     

    मी जलसंधारण मंत्री होतो तेव्हा मी महाराष्ट्राला 1 लाख कोटींचे प्रोजेक्ट वाटप केले. त्यावेळी महाराष्ट्रातील 55 जलसिंचनाचे प्रोजेक्ट होते. जे प्रोजेक्ट बंद होते. त्या प्रोजेक्टसाठी आम्ही 50 टक्के रक्कम प्रधानमंत्री सिंचन योजनेतून दिले आणि ते प्रकल्प पूर्ण केले.

    महाराष्ट्रात सशक्त विरोधी पक्ष म्हणून भाजपचं सरकारच्या कारभारावर टीका करणं हे कामही आहे आणि कर्तव्यही. पण मी केंद्रातील मंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की, ज्यावेळी अनेक वेळा अशा अडचणी येतात तेव्हा मी मुंबईत जातो.

    उद्धव ठाकरेजी, अजित पवार आणि सगळे मंत्री यांच्यासोबत बसतो. त्यांना आपले प्रश्न आणि समस्या सांगतो. हे प्रश्न सोडविण्याची त्यांना विनंती करतो.

    मी केंद्रात महाराष्ट्राचा मंत्री आहे त्यामुळे माझ्याकडून राज्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला मदत करतोय.

    राज्यात कोणाचं सरकार आहे आणि कोणाचं नाही यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे महाराष्ट्र, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी इतिहास. एक मराठी माणूस म्हणून मला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो. महाराष्ट्राकडे मी एक जबाबदारी म्हणून बघतो.

    मनं जोडलेच पाहिजेत त्याकरता मला दुधात साखर टाकता येईल तेवढीच टाकण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन.

    रस्ताही जोडेन आणि मनंही जोडण्याचा प्रयत्न करेन.

    एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

    BJP-Shiv Sena together? Gadkari’s suggestive statement; Not only Mumbai-Delhi road but also Mumbai-Delhi mind will be connected …

     

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा