विशेष प्रतिनिधी
रांची – झारखंड विधानसभेत नमाज कक्षाला विरोध करत भाजप आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला. आमदारांनी जय श्री रामच्या घोषणा देत तसेच हनुमान चालिसा म्हणत हौद्यात धाव घेतली. BJP opposed Speakers decision
सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी नमाज कक्षासह राज्य सरकारच्या रोजगार धोरणाला विरोध दर्शवित निदर्शने करण्यास सुरूवात केली. विधानसभा अध्यक्ष रविंद्र नाथ महातो यांनी त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली.
झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी खोली देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. मात्र, भाजपने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हा आदेश मागे घेण्याची भाजपची मागणी आहे.
अध्यक्षपदाचा अनादर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर तुम्ही रागावला असाल, तर मला मारा पण कामकाज थांबवू नका, असे वैफल्यग्रस्त उद्गार रविंद्र नाथ यांनी भाजप आमदारांना उद्देशून काढले.
अध्यक्षपदाची खुर्ची काही चेष्टेचा विषय नाही. तुम्ही कालही वाईट पद्ध्तीने वागला. हा झारखंडमधील साडेतीन कोटी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तुमचे वर्तन वेदनादायक आहे, असेही त्यांनी गदारोळ घालणाऱ्या भाजप आमदारांना सुनावले.
BJP opposed Speakers decision
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिंग्यांचा कर्दनकाळ, कट्टर मुस्लिमविरोधी बौध्द भिक्षू, फेस ऑफ बौध्द टेरर विराथू यांची कारागृहातून सुटका
- सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी
- अर्थव्यवस्था कात टाकतेय, नोकरदारांसाठी अच्छे दिन, २०२२ मध्ये मिळणार सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला दिल्लीतून डिवचले; बेळगावच्या निवडणुकीची मुंबईत नक्की पुनरावृत्ती