प्रतिनिधी
बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. BJP office bearers Of Beed Resigned
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे आतापर्यंत ७४ राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह ४ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. पंकजा आणि प्रीतम ताई मुंडे यांना पक्षांतर्गत वारंवार डावललं जात असल्याचा आरोप केज पंचायत समितीच्या सभापती परिमल विश्वनाथ घुले, उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, अनिता केदार, तानाजी जोगदंड, सुलाबाई सरवदे यांच्यासह इतर सदस्यांनी करून आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत.
पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्या बरोबरच त्यांना पक्षात मानाचं स्थान असावे, अशी भावना देखील मुंडे समर्थकांनी व्यक्त केली आहे.
- नाराज भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र
- जिल्हाध्यक्ष यांच्यासह ७४ जणांचे राजीनामे
- केज पंचायतीच्या सभापती, उपसभापतीसह
- ४ सदस्यांनी दिला राजीनामा
- पंकजा मुंडे घेतील तो निर्णय मान्य असल्याचा दावा
- मुंडे भगिनींना पक्षात मानाचं स्थान असावे, अशी भावना