• Download App
    “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण,”... | The Focus India

    “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण,”…

    • पडळकरांनी राऊंताची पुरती काढली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊंताची पुरती काढली आहे. सोशल मीडियावर पडळकरांनी संजय राऊतांना लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल होत असून लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

    bjp mla gopichand padalkar takes a dig at sanjay raut

    सामनाच्या अग्रलेखात संजय राऊतांनी पडळकरांचा उल्लेख गोपीचंद ऐवजी फेकूचंद पडळकर असा केला होता. त्यांच्या धनगर आरक्षणासाठीच्या विधिमंडळातील फलक आंदोलनाची खिल्ली देखील उडवली होती. त्यावर पडळकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून राऊतांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राऊतांच्या पवारनिष्ठेवर जबरदस्त प्रहार केले आहेत. राऊतांची मातोश्रीपेक्षा पवारांवर जास्त निष्ठा आहे, असे शिवसेनेतलेच आमचे मित्र सांगतात, असे म्हणून राऊतांना पुरते एक्स्पोज केले आहे.
    _____________________________________________________________________

    _____________________________________________________________________

    राऊतांच्या एकाच नव्हे, तर अनेक अग्रलेखांवर पडळकरांनी निशाणा साधला आहे. मला आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य तुमच्या सरकारने नाही, तर महामानव डॉ. आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. त्यामुळे मी एकदा नाही हजार वेळा धनगरी ढोल गळ्यात बांधून धनगर समाजाचे दुःख समाजाच्या वेशीवर टांगीन, असे पडळकरांनी पत्रात म्हटले आहे. नटी विरोधात गेली म्हणून उखाड दिया म्हणणारी कसली मर्दानगी?, तुमचा पगार किती? तुम्ही बोलता किती? जे खासदार निवडून आलेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बळावर निवडून आलेत हे विसरलात का?, असे बोचरे सवाल पडळकरांनी राऊतांना विचारले आहेत.

    bjp mla gopichand padalkar takes a dig at sanjay raut

    मी सभ्यता सोडली नाही म्हणून पवार चरणीतत्पर ही तुम्हाला शोभणारी उपाधी मी देत नाही, अशा शंब्दांत पडळकरांनी राऊतांचे वाभाडे काढले आहेत.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??