- आशिश शेलारांचा बोचरा सवाल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत खुसपटे काढून अडथळे आणण्यासाठी खासदार संजय राऊतांना कोण फूस लावतेय? कोण प्रवृत्त करतेय, असा सवाल भाजप आमदार आशिश शेलारांनी केला आहे. bjp mla ashish shelar takes on sanjay raut over ram mandir issue
श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून वर्गणी गोळा केला जाते आहे. कोट्यवधी लोक खारीचा वाटा उचलायला तयार आहेत, या पार्श्वभूमीवर, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला आशिश शेलारांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे?” असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे. bjp mla ashish shelar takes on sanjay raut over ram mandir issue
शेलार यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. “राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत..” असे शेलारांनी म्हटले आहे.
या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय “रामवर्गणी”, राम भक्त हो! मुंबई महापालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असे बोचरे ट्विटही शेलारांनी केले आहे.
bjp mla ashish shelar takes on sanjay raut over ram mandir issue
पायाभरणीचा कार्यक्रमही ऑनलाईन करण्याचा त्यांचा आग्रह होता. तेव्हाही अडथळाच आणत होते. आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छा निधीतून राम मंदिराचं काम होतेय, त्याला देखील अडथळा आणत आहेत. ते अगोदर म्हणायचे पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा आणायचा. या पद्धतीची राम विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे,” अशी टीकाही शेलारांनी केली.