वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणासाठी ९ कोटी रुपये खर्च केला जात आहे, असा आरोप भाजपचे नेते नवीन कुमार जिंदाल यांनी केला आहे. BJP leader Naveen Kumar Jindal has accused Delhi Chief Minister Arvind Kejriwal of spending Rs 9 crore of taxpayer’s money for upgrading his residence.
अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकारणासाठी राज्यातील जनतेच्या कराच्या पैशाचा अपव्यय केला जात असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांच्या घरासमोर त्यांनी एक व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यात ते म्हणतात, एकीकडे जनता कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. वैद्यकीय सेवेच्या नावाने राज्यात ठो ठो असताना मुख्यमंत्री केजरीवाल घराच्या नूतनिकरणासाठी कोट्यवधींचा खर्च करत आहेत.
राज्यातील जनता एक लिटर शुद्ध पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मात्र केजरीवाल हे घरात स्विमिंग पूल उभारण्यात दंग आहेत. या आरोपाबाबतचे पुराव्याचे पेपरही जिंदाल यांनी दाखविले.
दिल्ली राज्य सरकारने घराच्या नूतनिकरणाबाबत काढलेला आदेश तसेच नूतनिकारणासाठी ९ कोटींच्या खर्चास दिलेली मंजुरी याचा तपशील त्यांनी कागपत्रातून दाखविला. एवढ्या मोठ्या खर्चात ते काय नूतनीकरण करणार आहेत. ते स्विमिंग पूल आणि बाग तयार करणार आहेत का ?, असा सवाल त्यांनी केला.