वृत्तसंस्था
पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRPची रक्कम द्यावी, अशी आग्रही मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे. त्यासाठी आज पुण्यातील साखर संकुलावर आंदोलन केले.BJP Kisan Morcha Agited in front of Sakhar sankul for One Time FRP for cane sugar
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे . उसाची एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) तीन हप्त्यात देण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे. त्याचा निषेध म्हणून किसान मोर्चाने साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने केली. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासदेव काळे व कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करता आणि त्यांच्याच हक्काच्या पैशांवर कात्री लावली जात आहे. सरकार शेतकऱ्यांचे कैवारी नाही शत्रू आहे. ऊस ऊत्पादकांना ऊस टाकल्यावर १४ दिवसांत पैसे मिळावेत. अन्यथा भविष्यात भाजपा किसान मोर्चा मोठा आंदोलन उभरेल,असा इशारा काळे यांनी दिला आहे.
– भाजप किसान मोर्चा साखर संकुलवर धडकला
– ऊस उत्पादकांना FRP एक रकमी देण्याचा आग्रह
– FRP तीन हप्त्यात नको, शिफारस अमान्य
– ऊस उत्पादकांच्या हक्काच्या पैशांवर कात्री का ?
BJP Kisan Morcha Agited in front of Sakhar sankul for One Time FRP for cane sugar