• Download App
    भाजप म्हणे मित्र पक्षांना संपवतो!!; पण जाने कहाँ गये वो पक्ष??|BJP ends friendly parties!!; But know where did those parties go??

    भाजप म्हणे मित्र पक्षांना संपवतो!!; पण जाने कहाँ गये वो पक्ष??

    “भाजप मित्र पक्षांना हळूहळू संपवतो. पंजाब मध्ये अकाली दल आणि महाराष्ट्रात शिवसेना ही त्याची उदाहरणे आहेत. नितीश कुमार यांची हीच तक्रार होती. त्यांनी योग्य वेळेत निर्णय घेऊन भाजपपासून भारतात घेतली त्यांचा निर्णय योग्यच आहे,” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांचे बारामतीतून समर्थन केले आहे. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आणि ज्याचे त्याचे समर्थन!!BJP ends friendly parties!!; But know where did those parties go??

    उरातले ताजे दु:ख ओठांवर

    पण नितीश कुमार यांच्या निर्णयाच्या निमित्ताने भाजप मित्र पक्षांना हळूहळू संपवतो, हे जे पवारांचे वक्तव्य आले आहे म, त्यातून त्यांचे उरातले ताजे दुःखच ओठावर आले आहे!! या ताज्या दु:खावरची खपली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली आहे!! महाराष्ट्रात त्यांनी भाजप पासून शिवसेनेला तोडून जे महाविकास आघाडीचे सरकार बनवले ते सरकार अडीच वर्षांनंतर शरद पवारांना टिकवता आले नाही. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यापासून फुटणाऱ्या शिवसेनेला देखील सावरता आले नाही, हे ते दुःख असल्याचे फडणवीस यांनी बोट ठेवले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून याचा इन्कार करण्यात येईल हे उघड आहे. पण फडणवीस यांनी केलेल्या पलटवारात अजिबातच वस्तुस्थिती नाही असे कोणीही म्हणू शकणार नाही.



     पवारांच्या दुःखापेक्षा वेगळा प्रश्न!!

    पण शीर्षकात विचारलेला, “जाने कहा गये वो पक्ष?” हा प्रश्न मात्र पवारांच्या ताज्या दुःखापेक्षा वेगळा आणि त्या पलिकडचा आहे. किंबहुना तो पवारांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतल्या संबंधातल्या एका पैलूबाबतच विचारला आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवतो ही राजकीय वस्तुस्थिती मान्य केली तर ते मित्रपक्ष भाजप बाबत काय करतात?? आणि मूळातच मित्रपक्ष संघटनात्मक दृष्ट्या टिकवून ठेवण्याची जबाबदारी एकट्या भाजपची आहे??, की ती मूळ पक्षांची आहे?? हे प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाहीत.

    पवारांच्या सोबत गेल्यावर काय होते??

    आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पवारांच्या ताज्या दुःखाच्या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो तो म्हणजे दस्तूर खुद्द पवारांनी जे मित्रपक्ष आपल्याबरोबर आपल्या राजकीय कारकीर्दीतबरोबर घेतले त्या मित्र पक्षांचे पुढे नेमके काय झाले?? सध्या ते पक्ष कुठे आहेत?? त्यांची राजकीय वाटचाल कशी सुरू आहे?? हे ही प्रश्न तेवढेच कळीचे आणि तो विचारला गेले पाहिजेत, असेच आहेत. त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.

    ही वाचा यादी

    महाराष्ट्रातला शेतकरी कामगार पक्ष सध्या कुठे आहे?? कोणत्या अवस्थेत आहे?? लाल निशान पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शरद पवारांनी रिपब्लिकन ऐक्य घडवून एकीकृत रिपब्लिक पक्षाचे चार खासदार निवडून आणले होते. पण आज रिपब्लिकन ऐक्य, त्याची अवस्था, त्याचा राजकीय इतिहास आणि भवितव्य काय आहे?? जनता दल नावाचा पक्ष शरद पवारांबरोबर काही वर्षे होता. तो पक्ष महाराष्ट्रात आज कुठे अस्तित्वात आहे??… वर उल्लेख केलेले सर्व पक्ष आज कागदावर अस्तित्वात आहेत आणि महाराष्ट्रातले त्यांचे राजकीय अस्तित्व पुसले गेले आहे.

    काँग्रेस चौथा नंबर वर कसा??

    काँग्रेस नावाच्या पक्षाशी तर पवारांची राजकीय लव्ह – हेट रिलेशनशिप राहिली आहे. कधी ते काँग्रेस बाहेर होते, तर कधी ते काँग्रेसमध्ये होते. नितीश कुमार यांची फ्लिप फ्लॉप भूमिका खऱ्या अर्थाने मूळ पवारांची भूमिका आहे. पण पवारांशी संग केलेल्या काँग्रेसची आजची महाराष्ट्रातली अवस्था काय आहे?? एकेकाळी महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष असणारा, हाताचा पंजा चिन्ह सर्वाधिक प्रभावी असणारा पक्ष चौथा नंबर वर कसा फेकला गेला?? या प्रश्नांची उत्तरे थेट पवारांशी संबंधित आहेत ना!!?? मग या प्रश्नांची उत्तरे कोण देणार??

     बारामतीत न विचारलेले प्रश्न

    पवारांनी ज्या मित्र पक्षांबरोबर कायम आपले राजकारण चालवले, त्या मित्र पक्षांची अवस्था आज जर पूर्णपणे खस्ता असेल तर त्यात पवारांचा अजिबातच वाटा नाही असे म्हणता येईल का?? भाजप जर मित्र पक्ष हळूहळू संपवतो ही जर राजकीय वस्तुस्थिती मान्य केली तर मग शरद पवार आपले मित्र पक्ष वाढवतात का?? संघटनात्मक पातळीवर ते खूप मोठे करतात का?? महाराष्ट्रातले राजकीय वास्तव काय दर्शवते?? याचे उत्तर खरे म्हणजे बारामतीतल्या पत्रकारांनी पवारांना विचारायला हवे होते… पण तसे प्रश्न बारामतीतल्या पत्रकारांनी विचारले नाहीत. पवारांना ती उत्तरे देण्याची वेळ आली नाही. हे आजचे 10 ऑगस्ट 2022 चे वास्तव आहे.

    BJP ends friendly parties!!; But know where did those parties go??

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!