• Download App
    बंगाल सरकारचे प्रत्येक दुर्गा पूजा क्बलला ५० हजार रूपये जाहीर; भाजपची ममतांविरोधात निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार BJP delegation including state vice president Pratap Banerjee and Balurghat MP Sukanta Majumdar arrive at Election Commission West Bengal office

    बंगाल सरकारचे प्रत्येक दुर्गा पूजा क्बलला ५० हजार रूपये जाहीर; भाजपची ममतांविरोधात निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होताच पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळल्या आहेत.
    पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक दुर्गापूजा मांडवाला राज्य सरकार तर्फे 50 हजार रुपये देण्याची घोषणा तर त्यांनी केलीच आहे, पण त्याचबरोबर ममतांनी आणखी एक मागणी केली आहे ती केंद्रातल्या मोदी सरकारकडे नसून थेट युनेस्कोकडे केली आहे. युनेस्कोने बंगालमधील दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम म्हणून घोषित करावे अशी ही मागणी आहे. BJP delegation including state vice president Pratap Banerjee and Balurghat MP Sukanta Majumdar arrive at Election Commission West Bengal office

    ममतांच्या या खेळीवर भाजप खवळला असून बंगालमधल्या भाजप नेत्यांनी ममतांविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने भवानीपूरसह जांगीपूर आणि समशेरगंज या बंगालमधील पोटनिवडणूकीची परवा घोषणा केली आहे. तेव्हा तिथे आचारसंहिता लागू झाली आहे. अशा स्शितीत ममतांच्या सरकारने दुर्गा पूजा क्लबला ५० हजार रूपये देण्याची घोषणा करणे हा मतदारांना लाच देण्याचाच प्रकार असल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

    ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूरमधून उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांना निवडणूक लढविण्याला प्रतिबंध करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

    -दुर्गा पूजेला जागतिक वारसा जाहीर करण्याची मागणी
    तत्पूर्वी, ममतांनी आणखी एक मागणी केली आहे ती केंद्रातल्या मोदी सरकारकडे नसून थेट युनेस्कोकडे केली आहे. युनेस्कोने बंगालमधील दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम म्हणून घोषित करावे अशी ही मागणी आहे.

    युनेस्को जगभरातील विविध स्थळांना जागतिक वारसा पर्यटन स्थळे जाहीर करत असते. तशा स्वरूपाची वैशिष्ट्ये दूर्गापूजेमध्ये आहेत. कोट्यावधी जनतेची आस्था दुर्गा पूजेशी जोडली गेली आहे. म्हणून युनेस्कोने दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम घोषित करावे, असे पत्र ममतांनी युनेस्कोला पाठविले आहे.

    ममतांची पोटनिवडणूक 30 सप्टेंबर रोजी होत आहे. याच काळात बंगालमध्ये दुर्गापूजेला जोर असेल. अशा वेळी आपण हिंदुत्व विरोधी भूमिका घेऊन चालणार नाही हे ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम जाहीर करण्याच्या मागणीचा नेमक्या वेळी पुनरुच्चार केला आहे.

    BJP delegation including state vice president Pratap Banerjee and Balurghat MP Sukanta Majumdar arrive at Election Commission West Bengal office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…