Bipin Rawat Helicopter Crash : तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते गंभीररीत्या जळालेले आहेत. Bipin Rawat Helicopter Crash: CDS Rawat’s Helicopter Crash, see the mind blowing photos of the scene
वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला.
यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते गंभीररीत्या जळालेले आहेत.
दुर्घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर जनरल रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात होते. घटनास्थळी डॉक्टर, लष्कराचे अधिकारी आणि कोब्रा कमांडोचे पथक उपस्थित आहे.
जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगराच्या खालून आणखी काही मृतदेह दिसतात.
समोर आलेल्या अपघाताच्या व्हिज्युअल्समध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालेले दिसत आहे आणि त्याला आगही लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबातील सदस्य एमआय-सीरिजच्या हेलिकॉप्टरमध्ये होते जे तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान क्रॅश झाले. जवळपासच्या तळांवरून शोध आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांना सांगण्यात आले की, स्थानिकांनी 80 टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले आहेत. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, CDS जनरल बिपिन रावत स्वार असलेले IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर, तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ आज अपघातग्रस्त झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Bipin Rawat Helicopter Crash: CDS Rawat’s Helicopter Crash, see the mind blowing photos of the scene