• Download App
    मोठी बातमी! अहमदनगर : हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार ? काय आहे कारण... Big news! Ahmednagar: Hasan Mushrif to step down as Guardian Minister? What is because ...

    मोठी बातमी ! अहमदनगर : हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार ? काय आहे कारण…

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं अशी मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे. दोन वर्षांसाठीच पालकमंत्रीपद घेणार असल्याचं आपण पक्षाला सांगितलं होतं. याच कारणासाठी पालकमंत्रीपद सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.Big news! Ahmednagar: Hasan Mushrif to step down as Guardian Minister? What is because …

    महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अहमदनगरच्या पालकमंत्रिपदावर हसन मुश्रिफ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

    किरीट सोमय्या विरूद्ध हसन मुश्रीफ 

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ सातत्याने चर्चेत होते.

    या संदर्भात 2700 पानाचे पुरावे त्यांनी दिले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे पुरावे सोमय्या यांनी आयकर विभागाला सोपवले आहेत.

    Big news! Ahmednagar: Hasan Mushrif to step down as Guardian Minister? What is because …

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना