• Download App
    BIG BREAKING NEWS : Virat Kohli T20 चं कर्णधारपद सोडणार ... BIG BREAKING NEWS :virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup 

    BIG BREAKING NEWS : Virat Kohli T20 चं कर्णधारपद सोडणार …

    • Virat Kohli captaincy | टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे.virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup 

    वृत्तसंस्था 

    नवी दिल्ली :T20 नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती विराटने त्याच्या ट्विटर हँडवरून दिली आहे. विराटने सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केलं आहे. हे पत्रक इंग्रजीत आहे. भारतीय क्रिकेटचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो असं म्हटलं आहे. ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो असंही विराट कोहलीने म्हटलं आहे. आता विश्वचषक स्पर्धेनंतर T20 चं कर्णधारपद सोडणार आहे.BIG BREAKING NEWS :virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup

    विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

     

    रोहित शर्मा, रवी शास्त्री या सगळ्यांशी चर्चा करूनच आपण हा निर्णय घेतला आहे असंही विराट कोहलीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विराटवर काहीसं प्रेशर दिसत होतं. ते प्रेशर कॅप्टन्सीचं असावं अशी चर्चा होती. याच वर्क लोडचा उल्लेख विराट कोहलीने आपल्या पत्रकात केला आहे. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतलेला असू शकतो. विराट कोहली आक्रमक कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आहे.

    एकाही आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत विराट टीम इंडियासाठी चषक जिंकण्याची कामगिरी करू शकलेला नाही. विराट एक खेळाडू म्हणून खूप चांगला आहे. मात्र यशस्वी कर्णधार तोच असतो जो संघाला जास्तीत जास्त विजेतेपद मिळवून देऊ शकतो. मात्र विराटला या सगळ्याची कल्पना आली असणार त्यामुळेच आता होणाऱ्या T20 वर्ल्ड कपनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.

    कोहलीचं करिअर

    विराट कोहलीने भारताकडून 65 कसोटी, 95 वन डे आणि 45 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 38 कसोटींमध्ये विजय मिळवला, 65 वन डे जिंकले, तर 29 टी 20 सामने आपल्या नावे केले.

    BIG BREAKING NEWS :virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!