मुंबई: मुंबई-गोवा क्रूझवरील ड्रग्स केस प्रकरणी आर्यन खान याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कारण मुंबईतील किला कोर्टाने ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या NCB कोठडीत वाढ केली आहे.BiG Breaking News: Aryan Khan remanded in NCB custody till October 7
आर्यनच्या फोनमध्ये काही धक्कादायक फोटो आणि चॅटिंग सापडलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी. अशी मागणी एनसीबीकडून करण्यात आली होती.
दरम्यान, एनसीबीची ही मागणी कोर्टाने देखील ग्राह्य धरली. मात्र, यावेळी कोर्टाने 11 ऑक्टोबरऐवजी 7 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानसह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांना मोठा धक्का बसला आहे.
हे कोणत्या ड्रग्स सिडिंकेटशी देणंघेणं नव्हतं. त्यामुळे त्यांची कस्टडी वाढविण्यात येऊ नये असा युक्तीवाद आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा हा युक्तीवाद ग्राह्य न धरता एनसीबीची कोठडी वाढवून देण्याची मागणी मान्य केली.