- महाराष्ट्रात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट बघावी लागणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता . 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली होती।. यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर देखील झाली होती मात्र आता परत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार नाहीत .BIG BREAKING – Maharashtra Schools: Decision not to open schools from August 17 after meeting of task force
टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास तीव्र विरोध केल्याने महाराष्ट्र सरकारने हा निर्णय स्थगित केला आहे .
वर्षा गायकवाड –
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.