एकेकाळी संपूर्ण पाकिस्तान वर अनिर्बंध सत्ता गाजवणारी भुट्टो परिवाराची पाकिस्तान पीपल्स पार्टी शरीफ बंधूंच्या सत्तेमागे गेली, अन तिची पुरती उबाठा शिवसेना झाली, असे म्हणायची वेळ पाकिस्तानातल्या सिंध आणि पंजाब प्रांतांमधल्या पाणीवाटपाच्या वादामुळे आली.Bhutto family losing control over Sindh due to Sindh canal project
त्याचे झाले असे :
शहाबाज शरीफ यांच्या सरकारने सिंध प्रांताचे हक्काचे सिंधू नदीचे पाणी पंजाब प्रांतात वळवण्यासाठी मोठे कालवे बांधायची योजना आखली. ती अंमलात आणून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. पण योजना आखणे आणि ती अंमलात आणणे एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहिले नाही कारण सिंध प्रांतामध्ये भुट्टो परिवाराच्या पीपल्स पार्टीची सत्ता आहे, तर पंजाब मध्ये शरीफ परिवाराच्या मुस्लिम लीगची सत्ता आहे. पण पाकिस्तानात केंद्र सरकारमध्ये मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्तेमध्ये सहभागी झाली आहे. असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, तर नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. शहाबाज शरीफ यांच्याच मंत्रिमंडळात काहीच महिन्यांपूर्वी बिलावल भेटतो परराष्ट्रमंत्री होते.
वास्तविक मुस्लिम लीग नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी त्यांनी पाकिस्तानात एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पार्टीला पूर्ण बहुमत मिळाले नाही. हे लक्षात येतात मुस्लिम लीग (नवाज) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी हात मिळवून पाकिस्तानाची सत्ता बळकावली. या सत्तेतला मोठा वाटा मुस्लिम लीगला (नवाज) मिळाला, तर छोटा वाटा पाकिस्तान पीपल्स पार्टीला मिळाला कारण त्यांचे संख्याबळ तसे होते.
– शरीफ बंधूंचा डाव
सत्ता स्थापन होऊन दीड वर्षांनंतर शहाबाज शरीफ सरकारने एक मोठा डाव खेळला. पाकिस्तानातल्या सिंधू नदीवर वेगळे कालवे बांधून सिंधूचे पाणी पंजाब मध्ये वळविण्याची योजना आखली. तिला “कृषी क्रांती 2” असे नाव दिले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी या योजनेला मान्यता दिली, आणि इथेच सिंध प्रांतात भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी विरुद्ध असंतोषाची ठिणगी पडली. कारण सिंध प्रांताचे हक्काचे सिंधू नदीचे पाणी शहाबाज शरीफ यांच्या सरकारने पंजाब कडे वळवले. त्यामुळे सिंध प्रांतात संताप उसळून सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर जाळण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. त्यानंतर कालच असिफ अली झरदारी यांची थोरली मुलगी असिफा भुट्टो झरदारी हिच्या गाड्यांच्या ताफ्यावर आंदोलकांनी दगडफेक करून हल्ला केला. असिफा भूतो ही केवळ यांची मुलगी नसून आता पाकिस्तानी “फर्स्ट लेडी” आहे. पण तिच्याही ताफ्यावर हल्ला करायला आंदोलकांनी मागे पुढे पाहिले नाही. पाकिस्तान पीपल्स पार्टीची सिंध प्रांतावरची राजकीय पकड दिल्ली झाल्याचे ते निदर्शक ठरले
– पवारांच्या नादी लागलेली शिवसेना
नेमके असेच पाचच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडले होते. भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. ते बहुमत शिवसेना – भाजप युतीला मिळाले होते, पण भाजप एकट्याच्या बळावर सरकार बनवू शकणार नाही म्हणून ठाकरेंची अखंड शिवसेना पवारांच्या अखंड राष्ट्रवादीच्या नादी लागली. त्यांनी भाजपची साथ सोडली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीने आणि काँग्रेसच्या टेकूने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद बळकावले. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या नद्यांमधून फार मोठे राजकीय पाणी वाहून गेले आणि शेवटी पवारांच्या नादी लागल्याचे “राजकीय फळ” उद्धव ठाकरे यांना मिळाले. हातातली सत्ता गेली. मुख्यमंत्री पद तर गमावले गेलेच, पण त्याचबरोबर शिवसेना नावाचा पक्ष देखील उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटला. तो एकनाथ शिंदे यांच्या हाती आला. पवारांनी आपला पक्ष फुटू दिला. पुतण्याला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊ दिले. पवारांनी भाजप विरोधाचा देखावा व्यवस्थित उभा केला, पण ठाकरे आणि काँग्रेस यांना नेहमीच्या स्वभावाप्रमाणे दगा दिला.
पाकिस्तानात नेमके हेच घडले. भुट्टो परिवाराची पाकिस्तान पीपल्स पार्टी शरीफ बंधूंच्या सत्तेच्या मागे फरफटत गेली सिंध प्रांताच्या हक्कावर पाणी सोडते झाली आणि शेवटी सिंध प्रांतावरची दीर्घकाळची राजकीय पकड गमवायची वेळ पाकिस्तान पीपल्स पार्टीवर आली. बेनझीर भुट्टो आणि आसिफ अली झरदारी यांच्या मुलीला लोकांच्या शिव्या आणि दगड खायची पाळी आली. हे सगळे शरीफ बंधूंच्या राजकीय डावपेचांमुळे घडले. भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची पुरती उबाठा शिवसेना झाली!!
Bhutto family losing control over Sindh due to Sindh canal project
महत्वाच्या बातम्या