नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आत्तापर्यंत ईडी, सीबीआय चौकशीचे फेरे आले. काहींना अटक झाली पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले नाहीत. निदर्शने केली नाहीत. पण आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोर्चे काढून निदर्शने केली आहेत. याचे राजकीय रहस्य काय आहे…?? Bhujbal, there were no rallies during the arrest of Deshmukh, only rallies during the ED interrogation of Nawab Malik !!; What’s the secret
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ाऊद इब्राहिम चा भाऊ इक्बाल कासकरने ईडीच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव घेतल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. मग नवाब मलिक ईडीच्या चौकशीत नेमके कुणाचे नाव घेतील…?? मलिक हे नेमके कोणाचे नाव घेतील याची भीती राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना वाटते आहे…?? मलिकानी कोणाचे नाव घेऊ नये यासाठी वेगळा दबाव तयार करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर मोर्चा काढत आहेत का…??, हा सवाल तयार झाला आहे.
आत्तापर्यंत ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या आणि अटकेच्या फेऱ्यात छगन भुजबळ, प्रफुल पटेल पवार कुटुंबीय, अनिल देशमुख हे नेते सापडले होते आणि आहेत. इतकेच काय पण अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर ईडीने छापे घातले होते. 184 कोटी रुपयांचा हिशोब त्यांच्याकडे मागण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक तिखट प्रतिक्रिया जरुर व्यक्त केल्या, पण मोर्चे काढले नाहीत. आज मात्र नवाब मलिक यांना ईडीने फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीने मोर्चे काढले!! याचे राजकीय रहस्य कशात दडले आहे…?? नवाब मलिक या चौकशीत नेमके कोणाचे नाव घेतील याची भिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे…??
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चामध्ये अनेकांनी डोक्यावर टोप्या घातल्या आहेत. “आम्ही साहेबांबरोबर”, असे त्यावर लिहिले आहे. ईडीने राष्ट्रवादीच्या साहेबांना नव्हे, तर नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची 5 तासांहून अधिक चौकशी सुरू आहे पण दुपारी 1.00 वाजेपर्यंत त्यांच्या अटकेची बातमी आलेली नव्हती. तरी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डोक्यावर “आम्ही साहेबांबरोबर” अशा टोप्या घालून मोर्चा काढून निदर्शने करत आहेत. याचा अर्थ नेमका काय काढायचा…?? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमके कोणत्या “साहेबांबरोबर” आहेत…?? याचे उत्तर अजून मिळालेले नाही…!!
Bhujbal, there were no rallies during the arrest of Deshmukh, only rallies during the ED interrogation of Nawab Malik !!; What’s the secret
महत्त्वाच्या बातम्या
- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ‘ईडी’च्या रडारवर ; ईडी कार्यालयामध्ये चौकशीला सकाळपासून सुरूवात
- इस्लामपुरात एकाच वेळी ३५ जुळी व्यासपीठावर; २२-२-२२ तारखेचा अनोखा योगायोही जुळला
- Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!
- Nawab Malik ED : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने नाव घेतल्यानंतर नवाब मालिकांची ईडी चौकशी!!