भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??, असा सवाल छगन भुजबळ आणि जरांगे यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या भाषणावरून आणि राजकीय हालचालींमधून उभा राहिला आहे.Bhujbal – Jarang’s Caste Reservation Agenda; But who is raising the flag against the unity of Hindutva??
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरुद्ध बोलू नये. बोलल्यास जपून बोलावे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. तो सल्ला दोघांनी तोंड देखल्या मान्य केला, पण प्रत्यक्षात एकमेकांविरुद्ध तोफा डागायचे सोडले नाही. उलट एकमेकांविरुद्ध तोफांचा मारा अधिकच तिखट केला. छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याचीच मागणी करून जरांगेंच्या मूळ मागणीवरच कुठाराघात केला. त्यावर भुजबळांना टार्गेट करून जरांगे यांनी ओबीसींची मधलं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा करून टाकली.
सुप्रिया सुळे यांनी वेचक – निवडकपणे छगन भुजबळ यांना सल्ला दिला, पण जरांगेंना त्यांनी सल्ला देणे टाळले. भुजबळांनी ओबीसी आरक्षण – मराठा आरक्षण हे दोन्ही विषय महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मांडावेत. व्यासपीठावर येऊन मांडण्याची गरज का पडते??, हे मंत्रिमंडळाचे मिस्ड मॅनेजमेंट आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी हाणला.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ ही लढाई वाटते तेवढी वरवरची नाही. अगदी अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीत शरदनिष्ठ गटाच्या ऋषिकेश बेदरेला अटक झाल्यानंतर देखील त्याचा जो पर्दाफाश झाला, त्यातून शरदनिष्ठ राष्ट्रवादी एक्स्पोज झाली, असे मानले तरी जरांगे विरुद्ध भुजबळ ही लढाई अंतरवली सराटीतल्या दगडफेकी पुरती देखील मर्यादित नाही, असे म्हणावे लागते.
जरांगे आणि भुजबळ या दोन नेत्यांमध्ये उभी केलेली खरी लढाई महाराष्ट्रातल्या “पॉलिटिकल पर्सेप्शनची” लढाई आहे. महाराष्ट्रातले “पॉलिटिकल पर्सेप्शन” भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आल्यानंतर पूर्णपणे अँटी पवार आणि हिंदुत्ववादी झाले. त्यातही उद्धव ठाकरेंची शिवसेना हिंदुत्व हा मुद्दा बाजूला टाकायला तयार नव्हती आणि नाही. त्यामुळे दोन प्रमुख सत्ताधारी पक्ष हिंदुत्ववादी आणि उद्धव ठाकरेंचा प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना हा देखील हिंदुत्ववादी आणि उरलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे फक्त तोंडी फुले शाहू आंबेडकरवादी अशी राजकीय मांडणी झाली. यातून शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा मूळ अजेंडा पूर्णपणे संपुष्टात आला. तो पूर्ण अजेंडाच मुळात जातीवर्चस्वनिष्ठ महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचे राजकारण आपल्या अजेंड्याभोवतीच फिरले पाहिजे. ते फिरत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने ते फिरवण्याचा प्रयत्न करतो, हे पवारांना दाखवून द्यायचे आहे आणि त्यातूनच मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ ही लढाई उभी केली गेल्याचे दिसून येते.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना केलेली गावबंदी ही फक्त भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर लादली गेली. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते त्यातून चतुराईने सुटले. ते आजही कुठल्याही गावात जाऊ शकतात. ठाकरे गट महाराष्ट्रात एवढा प्रबळ उरलेलाच नाही, की त्याच्यावर या गावबंदीचा परिणाम होईल. पण गावबंदीचा चटका भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सहन करावा लागला. त्यातही प्रामुख्याने भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यांनाच तो चटका आजही सहन करावा लागत आहे आणि इथेच शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा खरा जातीवर्चस्वनिष्ठ अजेंडा समोर येतो.
पण त्या पलीकडे जाऊन छगन भुजबळ देखील जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे येतात आणि तो एक हाती पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, त्याचे देखील राजकीय इंगित वरवर दिसते तेवढे उथळ नाही. छगन भुजबळ हे शिवसैनिक असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुरलेले नेते आहेत. जातीनिष्ठ आरक्षणाच्या मुद्द्यावरच तर शरद पवारांनी त्यांना फोडून शिवसेनेतून फोडून त्यावेळच्या काँग्रेसमध्ये आणले होते. त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटलांना उठवायचे आणि दुसरीकडे भुजबळांना सिग्नल द्यायचे आणि त्यातून हिंदुत्ववादाकडे झुकलेला महाराष्ट्राचा राजकीय अजेंडा पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाखाली जातीवर्चस्वाकडे ओढून घ्यायचा हा खरा अजेंडा आहे.
पवारांचे “डीप स्टेट”
वेगळ्या भाषेत बोलायचे झाले तर पवारांचे हे “डीप स्टेट” आहे. जातीवर्चस्वनिष्ठ अजेंड्यातूनच व्यापक हिंदुत्ववादी अजेंड्याला छेद देण्याचा पवारांचा मानस आहे. म्हणूनच वरवर पाहता जरांगे विरुद्ध भुजबळ अशी लढाई दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती तशी नाही. ती त्या पलीकडची आहे आणि वर दिसते त्याहीपेक्षा ती अधिक खोल आहे, हेच स्पष्ट होते.
Bhujbal – Jarang’s Caste Reservation Agenda; But who is raising the flag against the unity of Hindutva??
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी म्हणाले- MP, CG, राजस्थानात इंडिया आघाडी संपणार, काँग्रेस-BRS एकमेकांची कार्बन कॉपी
- भारतीय पर्यटकांसाठी मलेशियात व्हिसामुक्त प्रवेश; 1 डिसेंबरपासून सुरू होईल सुविधा
- फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेती योजनांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत सांमजस्य करार!!
- आली आली पुन्हा आली, ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली!!; पण दौरा होणार की नाही, माहिती नाही!!