वृत्तसंस्था
बरेली : भीम सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सीमा सिंह यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. Bhim Sena Women State President Threatened to CM
सीमा सिंह यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत त्या मुख्यमंत्र्यांना धमकी देत असून अपशब्द वापरत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य शब्द वापरत आहेत. बरेलीचे एसपी आणि डीएसपीच्या विरोधात त्या बोलताना दिसत आहेत. बरेली पोलिसांनी त्याच्याविरोधात आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१९ सप्टेंबर रोजी बंटी आणि महेश या मुलांमध्ये सिरौली शहरात वाद झाला. यातून दोन्ही गटांची मारामारी झाली. शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांवर कारवाई केली. त्याच दिवशी, सीमा सिंह यांनी बंटीला सोडण्याची मागणी फोनवर केली होती. पोलिसांनी नकार दिल्याने ती चिडली होती. दुसऱ्या दिवशी, सीमा सिंहने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा व्हिडीओ जारी केला होता.
Bhim Sena Women State President Threatened to CM
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात भारत-पाकिस्तान सीमेवर तीन दहशतवाद्यांना अटक; हँड ग्रेनेड, 11 काडतुसे आणि पिस्तूल जप्त
- राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे पटोले-थोरात फडणवीसांच्या भेटीला, सत्तेतील सहकारी राष्ट्रवादी-शिवसेना नाराज!
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- 21 हजार कोटींचे हेरॉईन जप्त झाल्याची अंमलबजावणी संचालनालयाने घेतली दखल, मनी लाँडरिंगची करणार चौकशी