प्रतिनिधी
मुंबई – राम जन्मभूमीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, आम आदमी पक्षाच्या खासदाराने पण मुंबईत राडा झालाय दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर मारामाऱ्या झाल्या. Bharatiya Janata Yuva Morcha BJYM workers protested outside Shiv Sena Bhavan
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग य़ांनी केला होता. या मुद्द्यावरून शिवसेनेने सामनातून टीका केली.
शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाने शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन केले. पण शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्तेत तिथे दाखल झाले. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.
भाजपचे कार्यकर्ते हातात दगड घेऊन शिवसेना भवनावर हल्ला करत आहेत, अशा अफवा पसरल्या. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते सेना भवनापाशी जमले. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. पोलीसांनी भाजपच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आरोप केले. केवळ अफवेवर विश्वास ठेवून शिवसैनिकांनी तिथे राडा केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला शिवसेना आमदार सचिन अहीर यांनी प्रत्युत्तर दिले.