• Download App
    वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या बंगळुरू पोलिसांनी परवानगी नाकारली, विविध संघटनांची पोलिसांत तक्रार आल्याने निर्णय । Bengaluru Police did not allow Munawwar Farooqui to show stand-up

    वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या शोला बंगळुरूत परवानगी नाकारली, विविध संघटनांची पोलिसांत तक्रार आल्याने निर्णय

    Munawwar Farooqui : वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकीला बंगळुरूमध्ये शो करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. विविध हिंदू संघटनांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फारुकीचा शो रद्द करण्याचे निर्देश संबंधितांना देताना पोलिसांनी ती व्यक्ती वादग्रस्त असल्याचे सांगितले. अनेक राज्यांनी त्याच्या कॉमेडी शोवर आधीच बंदी घातल्याचेही पोलिसांनी म्हटले. Bengaluru Police did not allow Munawwar Farooqui to show stand-up


    वृत्तसंस्था

    बंगळुरू : वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकीला बंगळुरूमध्ये शो करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. विविध हिंदू संघटनांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फारुकीचा शो रद्द करण्याचे निर्देश संबंधितांना देताना पोलिसांनी ती व्यक्ती वादग्रस्त असल्याचे सांगितले. अनेक राज्यांनी त्याच्या कॉमेडी शोवर आधीच बंदी घातल्याचेही पोलिसांनी म्हटले.

    एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, मुनवरच्या शोला परवानगी देण्यात आलेली नाही, तो आज कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, फारुकीने रविवारी संध्याकाळी ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा शो करण्याची योजना आखली होती. दिल्लीच्या कर्टेन्स कॉल्स इव्हेंटचे विशाल धुरिया आणि सिद्धार्थ दास यांनी बंगळुरूमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    तथापि, श्री राम सेना आणि हिंदु जनजागृती समितीसह विविध उजव्या संघटनांनी स्टँड-अप कॉमेडियनच्या विरोधात बेंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी मुनव्वर फारुकी यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.

    बेंगळुरूमधील अशोक नगर पोलिस स्टेशनने सभागृहाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “त्याच्या (फारूकी) विरुद्ध इंदूर, मध्य प्रदेश येथे आयपीसीच्या कलम २९८, २६९, १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर राज्यांतही असेच गुन्हे दाखल आहेत. मुनव्वर फारुकीच्या स्टँड-अप कॉमेडी शोला अनेक संघटना विरोध करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सौहार्द भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा शो रद्द करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.”

    Bengaluru Police did not allow Munawwar Farooqui to show stand-up

    महत्त्वाच्या इतर बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!