- पश्चिम बंगाल भाजपची मागणी
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली. bengal-bjp-writes-eci-deployment
भाजपाने लक्ष वेधले की मुस्लिमबहुल मतदारसंघातील महिला पूर्ण बुरखा परिधान करून मतदान केंद्रावर येतात. निवडणुकीवेळी कायदा सुव्यवस्थेची स्थिती राखण्यासाठी पुरुष सीपीएफ जवानांकडून त्यांची ओळख पटविली जाऊ शकत नाही. त्यामुळे महिला सीपीएफ पथकाची नेमणूक करावी.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने 18 नोव्हेंबरला मतदारयादी जाहीर केली. त्यात बांग्लादेश सीमाप्रदेशातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग क्रमांक 66 मधील मतदार संख्या १० टक्क्यांनी वाढली. दक्षिण परगणा जिल्ह्यातील मेटियाब्रज मतदारसंघ आणि सोनारपूर उत्तर येथेही अशीच वाढ झाल्याचा आरोप पक्षाने केला.
bengal-bjp-writes-eci-deployment
तसेच,मृत मतदार आणि ज्यांनी निवासस्थान बदलले आहे त्यांना यादीतून वगळलेले नाही. मागील निवडणुकांमध्ये ही मतेही दिल्याचे दिसून आले.