बेल बॉटम भारतात 1,500 स्क्रीनवर 4,500 शोसह रिलीज झाला आहे. तथापि, कोविड 19 साथीच्या आजारामुळे बहुतांश ठिकाणी सिनेमागृहांमध्ये ५०% मर्यादेचे बंधन आहे.Bell Bottom Movie Collection Akshay Kumar Bell Bottom in Theaters, Huge Box Office Collection
वृत्तसंस्था
नवी दिल्ली :अक्षय कुमारने ॲक्शन थ्रिलर ‘बेलबॉटम’सह मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. अक्षयची ‘गुड न्यूज’ मूव्ही 18 महिन्यांपूर्वी रिलीज झाली होती. बेल बॉटम भारतात 1,500 स्क्रीनवर 4,500 शोसह रिलीज झाला आहे. तथापि, कोविड 19 साथीच्या आजारामुळे बहुतांश ठिकाणी सिनेमागृहांत ५०% मर्यादेचे बंधन आहे.
एचटीच्या वृत्तानुसार, ‘बेलबॉटम’ला पहिल्या दिवशी 3 कोटींचा आकडा पार करता आला नाही. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 2.50 ते 2.75 कोटींच्या दरम्यान आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये दिवसभरात 15% बुकिंग नोंदवली आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, या परिस्थितीत नवी दिल्ली चित्रपटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. कारण येथून देशव्यापी कमाईपैकी 20% योगदान मिळाले आहे. तथापि, संध्याकाळी प्रेक्षकांची संख्या कमी झाली. पहिल्याच दिवशी चित्रपटाला 3 कोटींचा आकडा पार करता आला नाही.
सध्या, ‘बेलबॉटम’ देशभरात 1000 पेक्षा कमी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिस इंडियाने नोंदवल्यानुसार, 15-20% बुकिंगमध्ये सुरू आहे. बेलबॉटम हा महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट आहे.
पण या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ‘रुही’ आणि ‘मुंबई सागा’ या चित्रपटांच्या तुलनेत कमी आहे. ‘रुही’ने पहिल्या दिवशी 3 कोटींहून अधिक कमाई केली, तर ‘मुंबई सागा’ ने 2.82 कोटींची कमाई केली होती.
अक्षय कुमारने ‘बेलबॉटम’ रिलीज होण्यापूर्वी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चिंता व्यक्त केली होती की, अशा महामारीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करणे धोकादायक आहे.
Bell Bottom Movie Collection Akshay Kumar Bell Bottom in Theaters, Huge Box Office Collection
महत्वाच्या बातम्या
राज्यांना ओबीसी यादी बनवण्याचा अधिकार मिळाला, राष्ट्रपती कोविंद यांनी विधेयकाला दिली मंजुरी