• Download App
    हात पिवळे होण्याआधी बँक खाते होतेय रिकामे; ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान ! Before the hands turn yellow Bank account is empty

    हात पिवळे होण्याआधी बँक खाते होतेय रिकामे; ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान !

    प्रतिनिधी

    नवी मुंबई : ऑनलाइन जोडीदाराच्या शोधमोहिमेत सर्वाधिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. त्यात काही मुली व त्यांच्या कुटुंबियांचे बँक खाते रिकामे करून पळ काढणारे देखील ठग ऑनलाइन बाशिंग बांधून सज्ज असतात. नवी मुंबईत अशा अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल असून, काही प्रकरणांचा गाजावाजा कुटुंबांनी बदनामी टाळण्यासाठी केला नाही. Before the hands turn yellow Bank account is empty

    काही वर्षांत ऑनलाइनला इतके महत्त्व आले आहे की, वधू किंवा वर शोधण्यासाठी ऑनलाईन साईटचा आधार घेतला जात आहे. मात्र त्या साईटवर दिलेली माहिती खरीच असते असे नाही. त्यामुळे प्रोफाईलवर दिसणारा चेहरा व माहिती खरी समजून लग्राची तयारी चालवलेल्या अनेक मुलींची ऐन वेळी फसवणूक झाली आहे.

    अशी होते फसवणूक

    विवाह इच्छुक मुलीने एखाद्या वेबसाईटवर विवाहासाठी नोंदणी केली असल्यास तिच्या अपेक्षांची माहिती मिळवली जाते. त्यानंतर त्याच पद्धतीने बनावट नावाने मुलाची प्रोफाइल बनवून संबंधित मुलीला संपर्क साधला जातो. विवाहाच्या आमिषाने
    बळी पडून मुलगी मुलाच्या इच्छेप्रमाणे वागू लागते. त्यातूनच मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक व मुलीची फसवणूक केली जाते.

    तरुणाविरोधात गुन्हा दाखल

    अशा बहुतांश प्रकरणांमध्ये संबंधित तरुणीची आर्थिक फसवणूक तर होतेच, मात्र काहीना लैंगिक शोषणाला देखील बळी पडावे लागले आहे. त्यामुळे घरबसल्या जावई शोधण्याचा मोह आवरता घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

    •  सावधान ! ठग ऑनलाइन बाशिंग बांधून सज्ज
    •  हात पिवळे होण्याआधी बँक खाते होतेय रिकामे
    •  ऑनलाइन जोडीदार शोधताना काळजी घ्या
    •  संबंधित व्यक्तीची खात्री समक्ष करुन घ्या
    •  पैशाचे व्यवहार विवाह होणार म्हणून करू नका
    •  घरबसल्या जावई शोध अनेकदा संकटात नेणार
    •  तरुणींच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाढला
    •  अनेकदा लैंगिक शोषण सुद्धा होते

    Before the hands turn yellow Bank account is empty

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??