राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह इतर गंभीर आरोप केले . अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सदरचे आरोप केले होते.आता थेट न्याय मागत सुप्रिया सुळेंना आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
बीड: सासूच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना बीडच्या अंबाजोगाईत घडली. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आता पीडितेने थेट सुप्रिया सुळेंकडे न्याय मागितला आहे .आता यावर सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Beed NCP: No action has been taken against NCP woman president for beating her daughter in law ; her complaint to Supriya Sule directly, warning of self-immolation …
सुप्रियाताई, मला न्याय द्या…
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडेदेखील आपली कैफियत मांडली असं पीडितेने सांगितले मात्र, त्यांच्याकडूनही न्याय मिळणार नाही म्हणून शेवटी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आर्त हाक देत, ‘ताई तुम्हीच मला न्याय द्या, अशी मागणी केली आहे.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांनी त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे पहिले लग्न झालेले असतानाही अंधारात ठेवून, खोटी माहिती देऊन 19 सप्टेंबर 2021 ला लग्न लावून दिले. लग्नानंतर त्या गेली पाच महिने घरातील सर्व कामे करुन घेत असून जाणूनबुजून संगिता तुपसागर आपल्याला मारहाण करून त्रास देत आहेत. कधी अंगावर गरम पाणी टाकणे तर कधी वाटेल ती धमकी त्या देत आहेत. या गोष्टींना कंटाळून शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.
सुप्रियाताई, मला न्याय द्या, तुमच्या पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष आणि माझ्या सासूने माझ्या आयुष्याचा काय खेळ मांडला आहे, तो पहा आणि मला न्याय द्या. अन्यथा माझ्यासमोर आत्मदहन केल्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नाही’…
कोण आहेत या सासूबाई ?
संगीता तूपसागर या राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष आहेत.संगीता तूपसागर या पिडीतेच्या सासू असून, यांच्याकडे बीड महिला जिल्हाध्यक्षपद असल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
Beed NCP: No action has been taken against NCP woman president for beating her daughter in law ; her complaint to Supriya Sule directly, warning of self-immolation …