• Download App
    उत्साही व्हा आणि सतत आशावादी रहा। Be enthusiastic and constantly optimistic

    उत्साही व्हा आणि सतत आशावादी रहा

    व्यक्तीमत्व विकास म्हणजे नेमके काय असते. रोजच्या आपल्या जगण्यात काही बाबी केल्या तरी व्यक्तीमत्व सुधारण्यास मदत होते. नेहमी काहीतरी शिक्षणाचा आपला प्रयत्न आपलं ज्ञान वाढवण्यास मदत करेल ह्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी केलात तर तुम्ही समाजात, मित्रपरिवारात वा इतर लोकांमध्ये ओळखले जाऊ लागल ज्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपण जे काही शिकलात आणि आपल्याला जे काही माहिती आहे ते त्याचा उत्तम प्रकारे वापर करा. आपण ज्या विषयाला सामोरे जाल त्याचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या आणि त्यात निपुण झाल्यावर ते इतरांपर्यंत पोचवा. Be enthusiastic and constantly optimistic

    जर आपण आपलं ज्ञान योग्य रीतीने इतरांना सांगितलं तर आपण इतरांना आकर्षित कराल. स्वत:ला अभिव्यक्त करायची सवय लावा जे ठरवलं आहे ते तडीस नेण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न आणि सुसंगतता ह्या दोन गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता ह्या गोष्टीचा अवलंब करा. हार न मानणे हे अतिशय कठीण काम आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे केवळ काही आठवडे किंवा महिन्यांच्या प्रयत्नातून हे घडवून आणू शकतात. हार न मानण्याची वृत्त्ती म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखाच आहे. मजेशीर राहा आणि नेहमीच गंभीर होऊ नका. कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येकजण अशा व्यक्तीची संगती घेतो जो त्याला हसवतो किंवा प्रसन्न ठेवतो. इतरांना हसवण्यासाठी फक्त बाष्कळ विनोद मारु नका. संभाषण करीत असताना मजा करण्याचा प्रयत्न करा, इतर लोक नैसर्गिकरित्या आपल्याकडे आकर्षित होतील.
    पुढे नमूद केलेल्या गोष्टीही आपल्याला व्यक्तिमत्व विकासात मदत करतील. चलाख रहा मात्र थंड रहा. कोणाचीही नक्कल करू नका. आपली स्वतःची वैयक्तिक शैली तयार करा. स्वत:वर संशय घेऊ नका. सक्रिय श्रोता व्हा. संयम ठेवण्यास आणि आपल्या संभाषण कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यास शिका. आपल्या शब्दांनी नम्र आणि सभ्य व्हा. ओरडू नका किंवा आक्रमक होऊ नका. आपल्या कार्याबद्दल अधिक उत्साही व्हा आणि आशावादी व्हा. आपली कमकुवत बाजू ओळखा आणि स्वीकारा. इतरांचे कौतुक करायला शिका. हे आपल्यातही तेच गुण वाढवण्यास मदत करते.

    Be enthusiastic and constantly optimistic

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!